शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलित स्थानिकांना प्राधान्याने रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:59 IST

वणी वेकोलि परिसरातील कोळसा खाण कंपन्या आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले.

ठळक मुद्देसंजय राठोड : कोळसा खाण कंपन्या आणि वाहतूकदारांना स्पष्ट निर्देश

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : वणी वेकोलि परिसरातील कोळसा खाण कंपन्या आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले.येथील विश्रामगृहात कोळसा खाण कंपनी व मालवाहतूकदार संघटनांचे संचालक, प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासह वणीचे तहसीलदार, वेकोलिचे अधिकारी, परिवहन अधिकारी आदी उपस्थित होते.वणी वेकोली क्षेत्रातील उकणी, जुनाद, निलजई, मुंगोली आदी गावात काम करणाºया कंपन्यांमध्ये स्थानिक बेजरोजगारांना डावलून परप्रांतीय मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जात असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच एडीओबी, आरपीएलओबी, रंजीत ओबी आदी कंपन्यांद्वारे या भागात मालवाहू वाहनांवरही परप्रांतीय वाहनचालकांची भरती केली जाते, अशा तक्रारी होत्या. परिसरातील अनेक गावात शेतकºयांच्या जमिनीचे भूसंपादन करूनही त्यांना मोबदला दिलेला नाही, तसेच रोजगारही दिला नाही. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या तक्रारी सोडविण्याची मागणी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केली होती. त्याअनुषंगाने ना. संजय राठोड यांनी वेकोलि अधिकारी व प्रशासकीय अधिकाºयांची ही बैठक घेतली. वेकाली क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी येत्या एक महिन्यात स्थानिक बेरोजगारांना नियमाप्रमाणे रोजगार देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. राठोड यांनी दिले.या परिसरातून माती व कोळशाची वाहतूक करताना सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने ही वाहतूक गावाबाहेरून वळविण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना ना.राठोड यांनी दिल्या. भूसंपादन होऊनही अद्याप मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रोजगार देताना प्राधान्य देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.बैठकीला गैरहजर कामगार अधिकारी, वणी व शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही ना. राठोड यांनी यावेळी प्रशासनाला दिले.