शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

कळंब ग्रामीण रुग्णालयाला भेट

By admin | Updated: August 4, 2015 02:40 IST

उंदराने कुरतडलेले आलू, चिमलेले केवळ पाच वांगे, तीन टमाटे, पिण्याचे अशुध्द पाणी शिवाय स्वयंपाकगृहाची दयनीयता,

कळंब : उंदराने कुरतडलेले आलू, चिमलेले केवळ पाच वांगे, तीन टमाटे, पिण्याचे अशुध्द पाणी शिवाय स्वयंपाकगृहाची दयनीयता, ही गंभीर परिस्थिती सोमवारी आमदार डॉ. अशोक उईके यांनी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रत्यक्ष अनुभवली. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या समस्याही मांडल्या. यावर संताप व्यक्त करत आमदारांनी कर्मचाऱ्यांना खडसावले. या वसतिगृहातील विद्यार्थिनींना मेन्यूकार्डनुसार भोजन दिले जात नाही. एवढेच नाही, तर पोषण आहारही नियमानुसार मिळत नाही. मेनूकार्ड दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असताना मागणी करूनही आमदारांना मेनुकार्ड उपलब्ध करून दिले गेले नाही. भोजनाचा नमुनाही दाखविण्यात आला नाही. यानंतर त्यांनी स्वयंपाकगृहाची पाहणी केली. तेथील स्थिती पाहता भोजन कसे दिले जात असेल, यांची कल्पना आल्यानंतर आमदारांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला.वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी रात्री एकही सुरक्षा रक्षक नसतो. अधीक्षकांसह इतर कर्मचारी खासगी ठिकाणी वास्तव्याला असतात. याविषयी डॉ. उईके यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादवेळी केवळ एक केळी दिल्या जाते. पपईच्या फोडी सोडल्या, तर इतर कुठलेही फळ आजपर्यंत देण्यात आलेले नाही. भोजन कंत्राटदाराकडून वस्तूंचा व्यवस्थित पुरवठा केला जात नाही. शालेय वस्तू आणि आवश्यक साहित्य ठेवण्यास कुठलीही व्यवस्था नाही. गणवेश भत्ता अजूनही दिल्या गेला नाही, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली. दरम्यान, प्रभारी प्रकल्प अधिकारी डाखोरे यांच्याशी संपर्क करून या वसतिगृहातील अनागोंदी कारभाराची माहिती देत दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची सूचना आमदारांनी दिली. कारभारात सुधारणा करण्याची तंबी कर्मचाऱ्यांनाही यावेळी देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)कळंब ग्रामीण रुग्णालयाला भेट४आमदार डॉ.अशोक उईके यांनी ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. रुग्णालयातील सुविधा दर्शनी भागावर लावण्याची सूचना त्यांनी केली. कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रकही तपासले. शिपाई, लिपीक, वाहनचालक दुसरीकडे डेप्युटेशनवर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. बांधण्यात आलेल्या निवासस्थानी पाण्याची तत्काळ पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार संतोष काकडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत, भाविक भगत, शंकर मांढरे, मनोज काळे, मधुकर खैरकार आदी उपस्थित होते.