शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कोरोना नियमांचे उल्लंघन सव्वा कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत होती. पूर्णत: लाॅकडाऊन असूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत होते. अशांना पोलीस कारवाईचा फटका बसला आहे. मागील वर्षी २०२० मध्येसुद्धा पाच महिन्यांच्या कालावधीत लाॅकडाऊन होते. या काळात वाहतूक पोलिसांनी एक कोटी २१ लाख २१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला होता. या दंडात्मक कारवाईनंतरही अनेकजण जुमानत नसल्याचे चित्र आहे. आता कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी आवश्यक आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यात ५८,१३८ केसेस : शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटर वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ५८ हजार १३८ केसेस दाखल झाल्या. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणात दंडापोटी एक कोटी १९ लाख ४२ हजार ८०० रुपये वसूल केले. यातही विना मास्क फिरणाऱ्यांवर केलेल्या कारवाईची रक्कम वगळलेली आहे. कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत होती. पूर्णत: लाॅकडाऊन असूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत होते. अशांना पोलीस कारवाईचा फटका बसला आहे. मागील वर्षी २०२० मध्येसुद्धा पाच महिन्यांच्या कालावधीत लाॅकडाऊन होते. या काळात वाहतूक पोलिसांनी एक कोटी २१ लाख २१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला होता. या दंडात्मक कारवाईनंतरही अनेकजण जुमानत नसल्याचे चित्र आहे. आता कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणी तयारी करताना दिसत नाही. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येत आहेत. जेणेकरून गर्दी टाळता येईल व अपघात कमी होतील.

विना सीट बेल्ट सर्वाधिक दंड वसूलजानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत विना सीट बेल्ट प्रवास करणाऱ्या पाच हजार ३९३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल दहा लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

मोटर वाहन कायद्यानुसार केसेसइतर मोटर वाहन कायद्यानुसार सर्वाधिक ४६ हजार ९३५ केसेस करण्यात आल्या. त्यात ९६ लाख ८१ हजार ३०० इतका दंड वसूल झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही कारवाई अधिक प्रमाणात आहे. यापुढेही कारवाई सुरू आहे.

कोरोनाची तिसरी लाट थांबविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता सूट मिळाली असली तरी स्वत:ची काळजी घेत मास्कचा वापर करावा. कुठेही गर्दी करू नये. ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह करणे टाळावे. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीतूनही कोरोना संसर्गाला आळा घालता येतो. त्यामुळेच धडक मोहीम हाती घेतली आहे. दररोज अधिकाधिक केसेस करण्यावर भर आहे. नागरिकांनी सतर्क राहून स्वत:सह समाजाला सुरक्षित ठेवावे, हीच अपेक्षा आहे. त्याकरिताच वाहतूक नियमांची सक्ती आहे.- श्याम सोनटक्के, जिल्हा वाहतूक शाखा निरीक्षक, यवतमाळ

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या