शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवा करून आलेल्या सैनिकांचे यवतमाळ जिल्ह्यातील गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 11:24 IST

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील प्रेमेन्द्र पडगिलवार हे आपल्या राहत्या गावी बोरीअरबला परतले असता गावकऱ्यांनी त्यांची खुल्या जीपमधून सहपरिवार मिरवणूक काढून गावात जंगी स्वागत केले.

ठळक मुद्देढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत काढली गावात मिरवणूक

 लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील प्रेमेन्द्र पडगिलवार हे भारतीय सैनिक दलात 21 वर्ष पूर्ण करून निवृत्त झाले आहे.  ते आपल्या राहत्या गावी बोरीअरबला परतले असता गावकऱ्यांनी गावाच्या वेशी वरूनच ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतीषबाजीत त्यांची खुल्या जीपमधून सहपरिवार मिरवणूक काढून गावात जंगी स्वागत केले.

 प्रेमेन्द्र पडगीलवार हे 1999 मध्ये सीमा सुरक्षा दलात नोकरीला लागले, तब्बल 21 वर्ष देशसेवा करून काल ते आपल्या गावी परतले असता गावकऱ्यांचा स्नेह पाहून भारावून गेले. देशभक्तीपर गीतांच्या तालावर गावकऱ्यांनी ही ताल धरीत फटाक्यांच्या आतषबाजीत सैनिक प्रेमेन्द्र यांची सपत्नीक गावाच्या वेशी पासून तर त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढली.  यावेळी देशसेवा करून परत आलेल्या मुलाकडे पाहून सैनिक प्रेमेन्द्र यांच्या आईचाही उर भरून आला होता. गावकऱ्यांनी केलेले स्वागत हे अभूतपूर्व असल्याचे मत यावेळी प्रेमेन्द्र पडगिलवार यांनी व्यक्त केले

टॅग्स :Socialसामाजिक