शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

गावोगावी श्रमदान, श्रमाला प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:20 IST

दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्वसामान्य गावकऱ्यांना नवा हुरूप आला आहे.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनचे तुफान : महिला शिक्षणाधिकारी राबल्या शिरोली, ससानी, कुंभारीत

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्वसामान्य गावकऱ्यांना नवा हुरूप आला आहे.पाणी फाऊंडेशन अंतर्गत ‘सत्यमेव-जयते’ वॉटर कप स्पर्धा सुरु आहे. यात घाटंजी तालुक्यातून ४८ गावांनी सहभाग घेतला आहे. या सर्व गावांमध्ये श्रमदानाचे एकप्रकारे तुफान आले आहे. प्रत्येक गावातील आबालवृद्ध, सर्व नागरिक, विविध संघटना सहभाग नोंदवून स्वयंस्फूर्तपणे श्रमदान करीत आहे. त्यातच जिल्ह्याच्या ठिकाणावरुन येऊन शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी गावकºयांना नवा उत्साह दिला. त्यांच्या सोबत शिक्षक आणि विद्यार्थीही श्रमदानात सहभागी झाले आहे. शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी ससानीे, कुंभारी येथे हातात टिकास-पावडे घेऊन श्रमदान केले. शिरोली येथे तर भरदुपारी त्यांनी श्रमदान केले. उन्हाची तमा न बाळगता महिला अधिकारी गावापासून ते श्रमदानाच्या ठिकाणापर्यंत एक ते दीड किलोमीटर पायी चालत गेल्या. हे पाहून गावकऱ्यांचा उत्साह वाढला.येणाऱ्या पिढीसाठी जलसाठे भरपूर असावे. आपल्या चिमुकल्यांची पाण्यासाठीची पायपीट थांबावी म्हणून राबणाऱ्या हाताना आपल्या मदतीची जोड मिळावी असे मत शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी व्यक्त केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आॅनलाईन लिंक तयार करून शिक्षकांना या श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी घाटंजी तालुक्यात विविध गावांमध्ये शिक्षणाधिकारी पोहचल्या असता शिक्षकांनीही त्या-त्या ठिकाणी धाव घेवून श्रमदान केले. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी मागील वर्षीही राळेगाव तालुक्यात श्रमदान केले होते.दारव्हा शहरवासीयांनी काढली ‘वॉटर कप रॅली’दारव्हा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दारव्हा शहरात मंगळवारी वॉटर कप रॅली काढण्यात आली. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव-जयते’ वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५५ गावे सहभागी झाली आहे. गावकरी श्रमदानाद्वारे गावाच्या विकासासाठी झटत आहे. विविध प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु गावकºयांचा उत्साह कायम राहावा तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, शहरातील नागरिकांचा सुद्धा या कार्यात सहभाग वाढावा यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्या दृष्टीने तहसीलदार कार्यालयातून रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा तहसील परिसरात समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. पाण्याचे महत्व लक्षात घेता या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी दारव्हा शहरवासीयांना केले. पानठेल्याभोवती गर्दी करणाºया युवकांना उद्देशून ते म्हणाले भविष्यात पानठेल्या ऐवजी पाणी ठेले निर्माण झाले पाहिजे असे कार्य करा. सूत्रसंचालन गणेश भोयर यांनी केले. या रॅलीत मॉर्निंग वॉक ग्रुप, चैतन्य ग्रुप, व्यापारी संघटना, वकील संघटना, डॉक्टर संघटना, मेडीकल असोसिएशन, पत्रकार संघ, ज्येष्ठ नागरिक, महिला मंच यासह अधिकारी, कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.