शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

खेड्यातील शाळा आता नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: January 11, 2017 00:40 IST

संगणकाच्या युगात आता गावखेडी कात टाकत आहे. शाळासुद्धा आता नवे स्वप्न घेऊन पुढे येताना दिसत आहे.

ग्रामीण भागातही डिजिटल क्रांती : दारव्हा पंचायत समिती अंतर्गत लोकसहभागातून तब्बल ४० शाळा होत आहेत डिजिटल दारव्हा : संगणकाच्या युगात आता गावखेडी कात टाकत आहे. शाळासुद्धा आता नवे स्वप्न घेऊन पुढे येताना दिसत आहे. डिजीटल क्रांतीच्या या युगात पाटीवर अक्षरे गिरवत गिरवत आता विद्यार्थी डिजीटल फळा वापरत आहेत. नव्या शैक्षणिक क्रांतीची ही रम्य पहाट दारव्हा तालुक्यात उगवत आहे. विद्यार्थी क्षमता दृढ करण्यासाठी उपयोग व्हावा, शिक्षकांचा वेळ, अध्यापन कार्य सुरळीत आणि सहज, सोपे व्हावे, शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने दारव्हा पंचायत समिती अंतर्गत एका पाठोपाठ एक अशा तब्बल ४० शाळा डिजीटल झाल्या आहेत. तर चार शाळा मीनी डिजीटल झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने गावकरी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक व दानशूर व्यक्तींनी लोकसभाग देऊन प्रोजेक्टर, संगणकासह आवश्यक साहित्यांची खरेदी करून कार्यान्वित केली आहे. शाळा डिजीटल झाल्याने विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले आहे. पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम, ई-बुक्स विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध झाले आहेत. मनोरंजनातून व जलदगतीने शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण झाली आहे. तालुक्यातील पिंप्री, साजेगाव, निंभा, धनगरवाडी, महातोली, उमरी इजारा, दहेली, उचेगाव, रामगाव (हरू), घाटकिन्ही तांडा, लाडखेड, ब्रह्मी, बोरी, दुधगाव, खोपडी (बु.), लाडखिंड, सायखेड, महागाव, वडगाव गाढवे, खोपडी (खुर्द), भांडेगाव, वागदतांडा, चाणी, चिकणी, वडगाव (आंध), लोही, वरूड, कुऱ्हाड, धामणगाव देव, बोरेगाव, हरू, नायगाव, नखेगाव, नांदगव्हाण, दुधगाव, शेलोडी, ब्राह्मनाथ, पिंपळगाव, वारजई आदी ४० शाळा डिजीटल तर आंतरगाव, पिंपळगाव, चोरखोपडी, भोपापूर या चार शाळा मिनी डिजीटल झाल्या आहेत. लोकसहभागामध्ये प्रामुख्याने सचिन भारती यांनी सहा शाळांना लॅपटॉप दिले आहेत. राजाभाऊ ठाकरे व नुसरत अली खान यांनी शाळेसाठी जमीनदान दिली आहे. सुभाष यावले यांनी रोख २५ हजार, भावसिंग पवार यांनी संगणकासाठी २५ हजार, समीर बेग, नजीर बेग यांनी रोख २५ हजार, उत्तम राठोड यांनी २१ हजार रुपयांचा लोकसहभाग दिला आहे. शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, विस्तार अधिकारी विकास घाडगे, मुख्याध्यापक व सर्व सबंधित परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)