शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

विकास कामांचा गुंता यवतमाळ मतदारसंघात

By admin | Updated: December 6, 2015 02:32 IST

जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा क्षेत्रात शहरी व ग्रामीण भाग अशी सरमिसळ झाली आहे.

सुरेंद्र राऊत यवतमाळजिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा क्षेत्रात शहरी व ग्रामीण भाग अशी सरमिसळ झाली आहे. यवतमाळ नगरपरिषद आणि लगतच्या ग्रामपंचायती हा शहरी भाग तर उर्वरित गावे मिळून तयार झालेल्या या मतदारसंघात प्रत्येक घटकाच्या समस्या कायम आहे. विकासाच्या नावाखाली रस्ते चौपदरी होत असतानाच अनेकजण पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित आहेत. एकंदरच विकासकामांचा येथे गुंता झाला असून ते सोडविण्याचे आव्हान कायम आहे. झपाट्याने वाढत असलेल्या शहरीकरणातील समस्या आणि अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या दुर्गम भागातील गावच्या समस्या या दोहोंची सांगड येथे घालणे आवश्यक आहे. ग्रामीण भाग व शहरात आघाडी शासनाच्या काळात तत्कालिन आमदार दिवंगत नीलेश पारवेकर यांनी कधी नव्हे इतका भरघोस निधी मिळवून कामांना मंजुरी मिळाली होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर यातील बहुतांश कामे आजही फाईलांमध्ये बंद आहेत. सुदैवाने आमदार मदन येरावार यांच्या माध्यमातून अनुभवी नेतृत्व या विधानसभा क्षेत्राला लाभले आहे. त्यामुळेच आघाडीच्या काळात सुरू झालेला विकासकामांचा झंझावात त्याहीपेक्षा अधिक गतीने पुढे जावा, अशी अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र अतिशय निराशाजनक असल्याचे दिसून येते. आघाडी शासनाच्या काळात मंजूर झालेल्या कामांचेच नव्याने भूमिपूजन केले जात आहे. काही प्रकरणात तर चुकीच्या मंजुरीमुळे थेट न्यायालयात खटले दाखल झाले आहे. ही गुंतागुंत वाढत गेल्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या आझाद मैदानाचा विकास रखडला आहे. येथील समता मैदान (पोस्टल) खेळासाठी आरक्षित असले तरी त्यावर सातत्याने व्यावसायिक कार्यक्रमच घेतले जातात. एकमेव क्रीडांगण असलेल्या नेहरू स्टेडियमचीही अतिशय दुरवस्था झाली आहे. शहरात मध्यवर्ती भागात क्रीडाप्रेमींसाठी उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी सराव करता येईल असे हक्काचे मैदान उरले नाही. सांस्कृतिक क्षेत्रातही हक्काच्या नाट्यगृहाची वाणवा कायमच आहे. मागील १२ वर्षांपासून नाट्यगृहाच्या इमारतीचे काम सुरूच आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक परिसर यवतमाळला आहे. मात्र दुर्दैवाने येथे रोजगार निर्मिती करणारे कारखाने नाहीत. अनेकांनी आर्थिक लाभासाठी येथील जमिनी बळकावून ठेवल्या आहेत. उदयोन्मुख व प्रामाणिक उद्योजकांना येथे जागा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे बेरोजगाराची संख्या वाढत असून त्याचा परिणाम सर्वाधिक गुन्हेगारांचे शहर म्हणून यवतमाळची ओळख होत आहे. भाजपाचे आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वातच नगरपरिषदेत भाजपाला बहुमत मिळाले आहे. मात्र नगरपरिषदेच्या नियोजनशून्यतेमुळे अनेक समस्या शहरात निर्माण झाल्या आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर आज बकाल झाले आहे. सांडपाण्याचे नियोजन, घनकचरा, डंपिंग यार्डचा प्रश्न, शहरी भागात राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनांची स्थिती यासाठी राजकीय महत्त्वाकांक्षेचा वापर करणे आवश्यक आहे. घरकुलाच्या योजनांचे करोडो रुपये अखर्चित असून घरकुलांच्या योजना राबविल्या जात नाही. स्थानिक आमदार म्हणून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दारव्हा तालुक्यातील लाडखेड आणि बोरी सर्कलमधील गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात ग्रामीण भागातही भयावह स्थिती आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेले बोथबोडण गाव येते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम करून पिंपरी बुटी येथील शेतकऱ्यांशी हितगूज केली. मुख्यमंत्र्यासमक्ष समस्याही मांडण्यात आल्या. मात्र आता या गावात अजूनही अपेक्षित उपाययोजना झालेल्याच नाही. येथील मुख्य प्रश्न रखडलेल्या सिंचन प्रकल्पाचा आहे. सालोड हा मध्यम प्रकल्प पूर्ण होवूनही त्याच्या कॅनॉलचे काम मात्र झालेले नाही. काही ठिकाणी तर प्रकल्प तयार होण्यापूर्वीच डोंगरातून कॅनॉल काढल्याचे दिव्य काम येथे करण्यात आले आहे. या सर्व बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. महामार्गावर असलेल्या भांबराजा या गावात पिण्याच्या पाण्याची सोय अजूनही झालेली नाही. एकंदरच विकासात मंजूर कामे आणि प्रत्यक्षात सुरू न झालेली कामे असा गुंता तयार झाला आहे. शहरातून जाणाऱ्या गोदणी मार्ग कित्येक वर्षापासून निर्माणाधीन अवस्थेतच आहे. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असूनही त्याचे काम वेळेत करून घेतले जात नाही. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून हा विकास कामाचा गुंता सोडविण्याची गरज आहे. सत्तेतीलच नव्हेतर मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदार मदन येरावार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा जनतेत आहेत.