शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्पायर अवार्डला अत्यल्प प्रतिसाद;  महाराष्ट्रात यंदा कोविडमुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:04 IST

केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘इन्स्पायर अवार्ड’ योजनेला यंदा महाराष्ट्रातून अत्यल्प प्रतिसाद आहे.

ठळक मुद्देअपेक्षा अडीच लाख प्रयोगांची, आले केवळ सात हजार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासह त्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘इन्स्पायर अवार्ड’ योजनेला यंदा महाराष्ट्रातून अत्यल्प प्रतिसाद आहे. नियमानुसार राज्यातून दोन लाख ८२ हजार प्रयोग अपेक्षित असताना केवळ सात हजार विद्यार्थ्यांनी नामांकने दाखल केली आहेत.

विशेष म्हणजे, दरवर्षी या योजनेत देशातून सर्वाधिक नामांकने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून भरली जातात. यंदा मात्र कोरोनाचे संकट, त्यामुळे बंद असलेल्या शाळा, कमी झालेला शिक्षक-विद्यार्थी संपर्क याचा विपरित परिणाम होऊन नामांकनांमध्ये प्रचंड घट झाली आहे. शिवाय, दरवर्षी शाळेमार्फत नामांकने भरली जातात. यंदा कोविडमुळे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नामांकने मागविण्यात आली आहे.भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने राबविली जाणारी ही योजना महाराष्ट्रात राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या मार्फत राबविली जाते. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नामांकने भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र २५ सप्टेंबर उजाडूनही अपेक्षित नामांकने आलेली नाहीत.५६ हजार शाळांवर फोकससहावी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या ५६ हजार ४४० शाळांकडून प्रत्येकी पाच नामांकने मागविण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यातून दोन लाख ८२ हजार २०० विद्यार्थ्यांचे प्रयोग येणे आवश्यक आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ सहा हजार ५१९ नामांकने आली आहेत. यात जिल्हानिहाय अपेक्षित नामांकने अशी आहेत : अमरावती ८१६५, अकोला ५४४५, नागपूर ११७१५, यवतमाळ ९०४०, वर्धा ३५३५, भंडारा ३३४०, चंद्रपूर ६५७५, गोंदिया ४७४५, वाशिम ७५८, बुलडाणा ६७६५, गडचिरोली ४३१०, अहमदनगर ९८८५, औरंगाबाद १२८९०, बीड ७९१५, धुळे ३७१०, हिंगोली ३४८५, जळगाव ८१६०, जालना ६००५, कोल्हापूर ११३३५, लातूर ८२४५, नांदेड ९३७०, नंदूरबार ३४३०, नाशिक १२६४५, उस्मानाबाद५३३०, पालघर ८४३०, परभणी ६५४५, पुणे १९१९०, रायगड ७६८५, रत्नागिरी ७५८०, सांगली ७४४०, सातारा ८९५०, सिंधुदुर्ग ३८९०, सोलापूर १११०५, ठाणे १७११०, मुंबई १४३६५.यवतमाळात नामांकन नाही, तर पगार नाही!यवतमाळ जिल्ह्यातील १८०८ शाळांमधून ९ हजार ४० नामांकने अपेक्षित असताना केवळ ३५ नामांकने आली आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठवून नामांकने दाखल न केल्यास सप्टेंबरची पगार देयकेच स्वीकारली जाणार नाही, अशी तंबी दिली आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांशी चर्चा झाली असून आता नामांकने वाढतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र