शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वालीमाईच्या निष्णात हातांनी प्रसवते मातृत्व

By admin | Updated: July 9, 2014 23:52 IST

गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की,

।। हजारांवर बाळंंतपण : जेवणाचे ताट बाजूला सारत जाते धावून ।।किशोर वंजारी - नेर गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की, पुढचे जेवणाचे ताटही बाजूला सारुन धावून जायचे एवढेच तिला माहीत. हजारो मातांना मातृत्वाचा अत्युच्च आनंद देणारी ही वालीबाई मोहन जाधव आहे नेर तालुक्यातील बोंडगव्हाणची. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. अशा समयी गरज असते ती निष्णात डॉक्टरांची आणि आपुलकीच्या माणसांची. मात्र आजही ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सेवाच पोहोचल्या नाही. वर्षानुवर्ष त्याच त्या समस्या कायम आहे. मात्र या समस्यांवरही ग्रामीण ज्ञानाने मात केली. बाळंतपणासाठी परंंपरागत दाईचीच मदत घेतली जाते. पूर्वापार ज्ञानावर आजही ग्रामीण भागात दाईच सुरक्षित बाळंंतपण करते. नेर तालुक्यातील बोंडगव्हाण येथे ही बाळंतपणात वालीबाई जाधवचाच आधार असतो. आतापर्यंत तिने गावातील हजाराच्यावर बाळंतपण केले. कोणतीही शिक्षण नाही की प्रशिक्षण नाही. मात्र तिचे निष्णात हात डॉक्टरांना लाजवेल, अशा पद्धतीने बाळंतपण करते. ती गावकऱ्यांची आता वालीमाई झाली आहे. चंद्रमौळी झोपडीत राहणारी वालीबाई आज ७० वर्षाची आहे. दाईचे कोणतीही प्रशिक्षण तिने घेतले नाही. परंतु आई पुतळाबाई हिच्याकडून हा वारसा तिने घेतला. तरुण पणापासून आईसोबत जाऊन तिने बाळंंतपण करण्याची कला अवगत केली. आज ती एवढी निष्णात झाली आहे की, गावकरी एकवेळेस डॉक्टरांवर विश्वास ठेवणार नाही परंतु वालीबार्इंवर ठेवतील. रात्री-बेरात्री कधीही निरोप आला की वालीबाई तेवढ्याच तत्परतेने जाते. यासाठी तिने कधी पैशाचा मोह केला नाही. कुटुंबाला झालेल्या आनंदात जे काही मिळेल ते घ्यायचे आणि आपले घर गाठायचे, असा तिचा शिरस्ता आहे. म्हणूनच आज ती गावकऱ्यांची माई झाली आहे. आतापर्यंत केलेल्या बाळंंतपणाचे अनुभव कथन करताना वालीबाई सांगते, गेल्या ४० वर्षांपासून गावात दाईचे काम करीत आहे. बाळंतपणानंतर लोक कपडे, धान्य देतात. एवढेच नाही तर पाहुणचारही करतात. परंतु मी कधी अपेक्षा केली नाही. केवळ पोटुशी महिलेची सुटका करायची आणि आनंद पेरायचा एवढेच आपले काम. ४० वर्षाच्या या कामात आपल्याला कधीच वाईट अनुभव आला नाही. आला असेल तर तो मला आता आठवतही नाही. मात्र काही वेळा परिस्थिती गंभीर असते. प्रकरण लक्षात येताच आपण कुटुंबाला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देते. मात्र अनेकांची परिस्थिती दवाखान्यापर्यंत जाण्याची नसते तेव्हा मग आपले कसब पणाला लावावे लागते. वालीबार्इंनी बाळंंतपण केलेली आज अनेक जण मोठ्या पदावर आहेत. गावातील एकही घर असे नसेल की आपल्या हातून त्या घरचे बाळंंतपण झाले नाही, असे वालीबाई मोठ्या अभिमानाने सांगते. वालीबाईच्या परिवारात पती मोहन जाधव, दोन मुले, दोन मुली आहेत. तीन एकर शेतावर त्यांचे चरितार्थ चालते. नथणी बक्षीस बाळंतपणासाठी आपण कोणतीही बिदागी घेत नाही. जे काही दिले त्यावरच समाधान मानते. काही वर्षापूर्वी गावातील नारायण झोड यांच्या मुलीचे आपण बाळंंतपण केले. परिवाराला अत्यानंद झाला. त्यावेळी झोड परिवाराने आठ ग्रॅम सोन्याची नथ दिली. आजही ती नथ वालीबाईच्या नाकात आहे. मोठ्या गर्वाने ती नथणी आजही दाखविते. सुरक्षित मातृत्व शासन सुरक्षित मातृत्वासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. घरापासून रुग्णालयापर्यंत गर्भवती मातेला पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. गावागावात आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही बाळंतपणासाठी दाईचाच आधार घ्यावा लागतो. शासनाने या निष्णात दार्इंना आणखी प्रशिक्षण देऊन मातृत्व सुरक्षा अभियानात सहभागी करण्याची गरज आहे.