शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शिवसेनेचा विदर्भावर अन्याय; नियुक्त्यांमध्ये वैदर्भीय सैनिकांना स्थान नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 09:41 IST

शिवसेना नेते-उपनेत्यांच्या निवडीत अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ वगळता अन्य वैदर्भीय लोकप्रतिनिधींपैकी कुणालाही स्थान मिळाले नाही. त्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये ‘मातोश्री’ने अन्याय केल्याची भावना आहे.

यवतमाळ : शिवसेना नेते-उपनेत्यांच्या निवडीत अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ वगळता अन्य वैदर्भीय लोकप्रतिनिधींपैकी कुणालाही स्थान मिळाले नाही. त्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये ‘मातोश्री’ने अन्याय केल्याची भावना आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईत शिवसेनेच्या राष्टÑीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या अनुषंगाने राज्यातील शिवसेनानेते, उपनेत्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या; परंतु या नियुक्त्यांमध्ये मूळ वैदर्भीय एकाही सेना पदाधिकाºयाला स्थान मिळालेले नाही. खा. अडसूळ यांची नेतेपदी नियुक्ती झाली असली, तरी ते मुंबईकर म्हणून ओळखले जातात.विदर्भात शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार आहेत. एके काळी अमरावतीत सेनेचे तीन आमदार व एक खासदार होते. संपूर्ण हयात शिवसेनेत घालविलेले अनेक जण विदर्भात आहेत; परंतु यापैकी कुणावरही शिवसेनानेता किंवा किमान उपनेता पदाची जबाबदारी सोपविली जाऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विदर्भात निष्ठावानांची फौज१विदर्भात शिवसेनेमध्ये दिग्गज निष्ठावंतांची फौज आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड राज्यात अजित पवारांनंतर सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. ते महसूल राज्यमंत्रीसुद्धा आहेत. प्रतापराव जाधव हेसुद्धा तिसºयांदा खासदार आहेत.२याशिवाय माजी खासदार अनंतराव गुढे, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, माजी आमदार संजय बंड, विजयराज शिंदे, संजय गावंडे यासारखे कितीतरी निष्ठावंत चेहरे विदर्भातील शिवसेनेत आहेत. पद-प्रतिष्ठेच्या लालसेने कित्येकांनी शिवसेना सोडली; परंतु उपरोक्त मंडळी अजूनही सेनेचा भगवा हाती घेऊन आहेत, असे असताना त्यांची साधी उपनेतेपदावर वर्णी लागू नये, याबाबत शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना