शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

‘आत्मदाह’मध्ये वैदर्भीय कलावंत

By admin | Updated: September 10, 2015 03:04 IST

आत्महत्येने प्रश्न गुंतागुंतीचे होतातयवतमाळ : जगाचा पोशिंदा, सर्वांचा अन्नदाता, बळीराजा आज अस्मानी व सुलतानी व्यवस्थेचा बळी ठरतो आहे.

सुनील जयस्वाल यांची पत्रपरिषद : आत्महत्येने प्रश्न गुंतागुंतीचे होतातयवतमाळ : जगाचा पोशिंदा, सर्वांचा अन्नदाता, बळीराजा आज अस्मानी व सुलतानी व्यवस्थेचा बळी ठरतो आहे. निसर्गाच्या लहरी फेऱ्यातून कधी सुटका झालीच तर शोषणाने अनेक गिधाडे शेतकऱ्यांचे लचके तोडायला टपून बसलेले आहेत. आत्महत्येने प्रश्न सुटत नाही, तर अधिक गुंतागुंतीचे होतात. आत्महत्येनंतर कुटुंबाचे होणारे हाल पाहून संवेदनशील माणूस आत्महत्येपासून परावृत्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ‘आत्मदाह’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुनील जयस्वाल यांनी येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला. आत्महत्येनंतर आपल्या कुटुंबाला कोणता संघर्ष करावा लागतो, हे ‘आत्म्या’ला दाखविण्याचा चमत्कृतीजन्य प्रकार या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. आजपर्यंत आत्महत्येची कारणे आणि उपाय यावरच भर दिला गेला आहे. परंतु आत्महत्येनंतरचा भीषण संघर्ष वास्तवात मांडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘आत्मदाह’ हा चित्रपट आहे. संघर्ष मृत्यूनंतरचा हे या चित्रपटाचे सूत्र आहे, असे त्यांनी सांगितले. हा चित्रपट माझा आहे, त्यातला मी एक घटक आहे, हे आपलेपण वाटावे यासाठी वऱ्हाडी बोलीत संवाद लिहिले, असे लेखक रणजित राठोड यांनी सांगितले. निर्माता सुनील जयस्वाल मित्र असल्याने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशस्वीही झालो, असे ते म्हणाले. अनेकांशी चर्चा करून कथालेखनासाठी चार महिन्यांचा वेळ लागला, असे त्यांनी सांगितले.चित्रपटाचा नायक म्हणजे आत्महत्या केलेला शेतकरी ही भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलावंत राजाभाऊ भगत यांनी साकारली आहे. यापूर्वी मालिकांमधून, काही चित्रपटातून भूमिका साकारणारे अविश बन्सोड यांचीही यात भूमिका आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक छायाचित्रण दाभडी, बोरगाव आणि लोणबेहळ येथे झाले आहे. सहायक दिग्दर्शक राजेश वाठोरे, गीत आणि संगीत सुभाष माळवी यांचे आहे. मामा मरगडे, रत्ना कोल्हापुरे, रितेश कुमार, सुप्रिया पाटील, सुनील जयस्वाल, प्राची सूर्यवंशी, संगीता बारी आदींच्या भूमिका या चित्रपटात आहे. शेतकरी आत्महत्येनंतरचा भीषण संघर्ष चमत्कृतीद्वारे मांडणारा वैदर्भीय कलावंतांचा ‘आत्मदाह’ हा चित्रपट आहे. पत्रपरिषदेला रणजित राठोड, राजाभाऊ भगत, अविश बन्सोड, प्रेमकिशन राठोड, राजेश वाठोरे, सुभाष माळवी, मामा मरगडे, अशोक कोठारी उपस्थित होते. (सांस्कृतिक प्रतिनिधी)