लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शहरात सोमवारी विविध मागण्यांसाठी वेगवेगळी चार आंदोलने करण्यात आले. त्यामुळे आर्णीसाठी सोमवार हा खºया अर्थाने आंदोलनाचा दिवस ठरला. शहरातील पाणीपुरवठा, शेतकरी कर्जमाफी, अतिक्रमण असे विविध विषय आंदोलकांचे होते. संपूर्ण शहर आंदोलनमय झाल्यागत दिसत होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘ढोल बजाव’गेल्या अनेक महिन्यांपासून अधांतरी लटकलेल्या आर्णी पाणी पुरवठा योजनेला त्वरित गती द्यावी व प्रधानमंत्री आवास योजना नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात यावी, तसेच नगर परिषदेच्या विविध विकास कामांना गती देण्यात यावी,यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नगर परिषदेचे गटनेता चिराग शाह, निल वाघमारे, यासीन नागाणी, अंजली खंदार, सुनीता चिल्लवार, स्वाती व्यवहारे, उमा शिवरामवार, ज्योत्स्ना ठाकरे आदींनी सहभाग नोंदविला होता.सातबारा कोरा करा, प्रहार रस्त्यावरयेथील स्वस्तिक जिंनिंगसमोर प्रहार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात येऊन त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, अशी मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हा संघटक आशिष तुपकर, विलास पवार, तुषार भोयर, नितीन महल्ले आदींसह अनेकांची उपस्थिती होती.शहरातील खड्डयांसाठी मनसे आक्रमकयेथील मेन रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अपघातही वाढले आहे. हे खड्डे दुरूस्त करून देण्यात यावेत, यासाठी मनसेचे आंदोलन केले. सचिन येलगंधेवार, राहुल ढोरे, रब शेख, संदीप गाडगे, नाना राऊत, पप्पू बेतेवाड आदींसह अनेकजण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अतिक्रमणाविरोधात ठिय्यायेथील संभाजी नगरातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी नगर परिषदेसमोर प्रकाश माळवी यांनी आंदोलन सुरू केले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेला अनेक वेळा विनंती अर्ज देऊन सुद्धा मागील कित्येक वर्षांपासून काहीच कार्यवाही न झाल्याने माळवी यांनी आंदोलन सुरू केले आहे.
आर्णीत सोमवार गाजला विविध आंदोलनांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:47 IST
शहरात सोमवारी विविध मागण्यांसाठी वेगवेगळी चार आंदोलने करण्यात आले.
आर्णीत सोमवार गाजला विविध आंदोलनांनी
ठळक मुद्देविविध आंदोलने : राष्ट्रवादीचे ढोल बजाव, ‘प्रहार’ही रस्त्यावर