शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वणीत घातक शस्त्रसाठा जप्त

By admin | Updated: March 22, 2016 02:31 IST

वणी पोलिसांनी वेकोलि कर्मचाऱ्याची कार आणि घरातून रविवारी रात्री घातक शस्त्रसाठा जप्त केला. त्यात देशी बनावटीचे

वणी : वणी पोलिसांनी वेकोलि कर्मचाऱ्याची कार आणि घरातून रविवारी रात्री घातक शस्त्रसाठा जप्त केला. त्यात देशी बनावटीचे हॅन्डमेड शॉटगण, एके-४७ रायफलीचे १३ जिवंत काडतूस, दोन हत्तीमार राऊंड, चार धारदार लोखंडी तलवारी आदी शस्त्रांचा समावेश आहे. या प्रकरणी जतींदरसिंग ऊर्फ कालू सज्जन सिंग (३४), गॅरी आॅस्टींग जोसेफ (३३) दोघे रा. भालर वसाहत, विजय सिंग नवलकिशोर सिंग (३५) रा. बोधेनगर चिखलगाव ता. वणी या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३/२५, ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. ही घातक शस्त्रे कोठून आणि कोणासाठी आणली गेली, गेल्या किती वर्षांपासून हा शस्त्रांचा व्यापार सुरू आहे, त्यात कोण-कोण सहभागी आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अटकेतील तीन आरोपींपैकी एक वेकोलिचा कर्मचारी आहे. तर दुसरा अनुकंपातत्वावर वेकोलिमध्ये नोकरीसाठी प्रयत्नरत आहे. वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांना वाहनातून शस्त्रसाठा जाणार असल्याची टीप मिळाली होती. त्यावरून त्यांनी लालगुडा भागातील एमआयडीसी परिसरात नाकेबंदी केली. दरम्यान वणीकडून आलेल्या एम.एच.३१-एएच-९९९७ या कारची झडती घेतली असता त्यात जतिंदरसिंग याच्या कमरेला देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर खोचलेले आढळले. तर कारमध्ये दोन धारदार तलवारी लपविलेल्या आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान जतिंदरसिंग याच्या भालर वसाहतीतील घरीसुद्धा मोठ्या प्रमाणात अग्नी शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. त्यात प्रामुख्याने एके-४७ च्या १३ जीवंत काडतुसांचा समावेश आहे. या शस्त्रसाठा जप्तीने वणी विभागातील घातपाती कारवायांची संभाव्य तयारी उघड झाली. उपविभागीय अधिकारी माधव गिरी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, एपीआय दीपक पवार, सुदर्शन वानोळे, सैय्यद साजीद, डोमाजी भादीकर, सुनील खंडागळे, रूपेश पाली, सुधीर पांडे, शेख नफीज, रत्नपाल मोहोडे, प्रकाश गोर्लेवार, विजय बुरुजवाडे, राजेंद्र कमनर, प्रमोद जिड्डेवार यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)