शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी तालुक्यात संततधार

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे.

वणी : गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे. या संततधार पावसाने या चारही तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्पही प्रथमताच भरले आहेत. यावर्षी सुरूवातीच्या मृग नक्षत्रापासून पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत आणि कोरड्या दुष्काळात सापडले. कपाशीची वाढच खुंटल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. या कोरड्या दुष्काळातच यंदा शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी कपाशीची सीतादही करीत होते. व्यापारीही त्याचवेळी कापूस खरेदी सुरु करीत होते. मात्र यावर्षी दसऱ्याला कापूस निघणे अवघड झाले आहे.अत्यंत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना पोळ्याच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पोळ्याच्या दिवशी सोमवारी सायंकाळी हजेरी लावली. त्यानंतर गेले चार दिवस सतत पाऊस कोसळत आहे. शनिवारी आणि रविवारी तर दमदार पाऊस झाला. वणी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल ८0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर रविवार सकाळपासून आज सोमवार सकाळपर्यंत पुन्हा ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वणी तालुक्यात यावर्षी आजपर्यंत ५८३ मिलीमीटर पऊस झाला. मागीलवर्षी याच काळात तब्बल एक हजार ३५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, हे विशेष.पोळ्यापासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांना लाभ झाला आहे. मात्र कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशीचे पीक अद्याप संकटात आहे. शेतकऱ्यांची आशा सोयाबिनवर टिकून आहे. दरवर्षी दसऱ्यापासून कापूस वेचणीला सुरूवात होते. सीतादहीचा कापूस उच्च प्रतीचा असल्याने त्याला दरही चांगले मिळतात. त्यातूनच शेतकरी दसरा, दिवाळी सण साजरे करतात. तथापि यावर्षी पावसाच्या विलंबाने विजयादशमीला सीतादही होणे अवघड झाले आहे. पावसाच्या दडीने उत्पन्नातही घट येण्याची शक्यता कायमच आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्प भरले. मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प आणि पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण भरले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)