शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्र अधिकाºयाने केली अवैध सागवान कटाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:54 IST

वनाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका वनपरिक्षेत्र अधिकाºयानेच आपल्या शेतातील सागवानाची विनापरवाना तोड केल्याची धक्कादायकबाब हिवरी वनपरिक्षेत्रात पुढे आली आहे.

ठळक मुद्देहिवरीतील प्रकार : तक्रारीवरून फुटले बिंग, एसीएफकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका वनपरिक्षेत्र अधिकाºयानेच आपल्या शेतातील सागवानाची विनापरवाना तोड केल्याची धक्कादायकबाब हिवरी वनपरिक्षेत्रात पुढे आली आहे. एक-दोन नव्हे तब्बल ११० सागवान वृक्ष तोडल्याचे काजणी शिवारात दिसून आले. या प्रकरणाने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.हिवरी वनपरिक्षेत्रातंर्गत काजणी शिवारात मोबाईल स्कॉडचे आरएफओ पद्माकर विश्वनाथ नाल्हे व त्यांच्या पत्नी सविता नाल्हे यांच्या नावाने शेती आहे. या शेतातील सागवानाची नाल्हे दाम्पत्यांनी कोणतीच परवानगी न घेता थेट कटाई करून विक्री केल्याचा आरोप आहे. तसेच शेता लगतच्या जंगलातील सुध्दा सागवानाची कटाई करून तब्बल ११० झाडे एका ठेकेदाराला दिली. विशेष म्हणजे आरएफओ नाल्हे यांनी काजणी येथील एका शेतकºयाने पाच सागवान झाडे तोडतांना परवानगी घेतली नव्हती तर त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली होती. आता त्याच अधिकाºयाने पदाचा गैरवापर केला आहे, अशी तक्रार काजणी येथील प्रकाश राघोजी राऊत यांनी मुख्य वनसंरक्षकांकडे केली होती. याच तक्रारीवरून हिवरीचे आरएफओ शंकर हटकर यांनी नाल्हे यांच्या शेत प्रत्यक्ष जावून पाहणी केली. येथे त्यांना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केल्याचे आढळून आले. नाल्हे यांच्या शेतात किमान २० थुट येथे दिसल्याचे हटकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. शेताची सीमा निश्चित होत नसल्याने पुन्हा पाहणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. याशिवाय सहायक उपवनसंरक्षक गिरजा देसाई यांनी सुध्दा या शेताची पाहणी केली आहे.वनविभागातील जबाबदार अधिकारी कायदे मोडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा अधिकाºयांकडून वनाचे खरचं संरक्षण होईल काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. वनविभागातील वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आरएफओ नाल्हे यांनी शेतातील सागवानाची विना परवानगी तोड केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. याची चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त होताच सबंधीताचा दोष आढळल्यास कारवाईचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविण्यात येईल.- भानुदास पिंगळेउपवनसंरक्षक, यवतमाळ