यवतमाळ : शहरातील अॅटोरिक्षा चालकांनी आपल्या आॅटो मीटरच्या आवश्यक फीचा भरणा करून वैधमानपन शास्त्र निरिक्षकांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वैधमापनशास्त्र अधिनियम व त्याखालील नियमातील तरतुदीनुसार मीटर पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे पडताळणीबाबतच्या सुचना वैध मापनशास्त्र नियंत्रकांनी केल्या आहे. याची तत्काळ अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार यवतमाळ शहरातील आॅटोरिक्षा चालकांना आपल्या आॅटो मिटरची पडताळणी करावयाची आहे. पडताळणीसाठी रोड टेस्ट (डिस्टंस व टाईम) घेतली जाणार आहे. पडताळणी शुल्क २५० रूपये आहे. आॅटो मीटर पडताळणीची जागा व इतर माहितीसाठी वैध मापन शास्त्र कार्यालय, लक्ष्मी सदन, पत्रकार कॉलनी रोड यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन वैध मापनच्या सहाय्यक नियंत्रकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
आॅटोरिक्षा मीटरची वैधमापनकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2015 03:47 IST