यवतमाळ : महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते देशातच नव्हेतर जगभरात आहेत. त्यामुळेच त्यांचा वाढदिवसही सर्वत्र साजरा होतो. यवतमाळातही बिगबीच्या वाढदिवसानिमित्त वैष्णोदेवीची पूर्जाअर्चा केली जाणार आहे. यवतमाळातील अमिताभचे वयस्क चाहते श्याम कराळे महानायकाला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या दीर्घ आयुष्याकरिता ते आपल्या घरी वैष्णोदेवीची पूजाअर्चना करणार आहे. गेल्या ३४ वर्षांपासून ते अमिताभचा वाढदिवस साजरा करतात. कधी आपल्या घरी पूजाअर्चना करतात, तर कोणत्या वर्षी चारधार यात्रा करून अमिताभच्या दुर्घायुष्याकरिता प्रार्थना करतात. कराळे म्हणतात, मी अमिताभ बच्चन यांना मनापासून चाहतो. मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करतो. अमिताभसुद्धा लहान भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात. मी त्यांना भेटण्यासाठी जेव्हा मुंबईला जातो, तेव्हा ते गळाभेट घेतात. दोघांच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. परमेश्वर या महानायकाला १०० वर्षांचे आयुष्य देवो! (स्थानिक प्रतिनिधी)
‘बिगबी’च्या वाढदिवशी यवतमाळात वैष्णोदेवी पूजा
By admin | Updated: October 11, 2016 02:50 IST