शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वडिलांविना पोरक्या वैष्णवीने सर केला नीट परीक्षेचा अवघड गड, मिळवले 720 पैकी 700 गुण

By रवींद्र चांदेकर | Updated: June 14, 2023 20:59 IST

मामांचे सहकार्य : १२ वर्षांपूर्वी अपघातात गेले वडील

महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील पोखरी-इजारा येथील मूळ रहिवासी असलेल्या वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने नीटचा गड ७२० पैकी तब्बल ७०० गुण मिळवून सर केला. १२ वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर तिने मामांच्या घरी राहून यश प्राप्त केले.

वैष्णवीने प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीने कठीण परिस्थितीतून  कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता नीटमध्ये ९९.९८ टक्के गुण घेतले. वैष्णवीचे वडील शिक्षक होते. आई गृहिणी आहे. वडील रोहिदास राठोड यांना दोन मुली. २०१० मध्ये एका अपघातात वैष्णवीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर राठोड परिवार मूळगावी पोखरी येथे परतला. वैष्णवीच्या आईने दोन मुलींसह समोरील जीवन जगण्यास सुरुवात केली.

दोन्ही मुली अभ्यासात हुशार आहेत. यानंतर चंद्रपूर येथे वीज मंडळाच्या सेवेत असलेले वैष्णवीचे मामा शंकर जाधव (ह.मु. नागपूर) यांनी आपल्या दोन्ही भाच्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. वैष्णवीची मोठी बहीणही नीटमध्ये चमकली होती. मात्र, थोड्या गुणांनी तिचा एमबीबीएसचा प्रवेश हुकला. त्यामुळे ती बीएएमएस करीत आहे. 

वैष्णवीचे मामा शंकर जाधव तिला तेथील विद्यानिकेतन शाळेत प्रवेश दिला. तेथे तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तिने जय हिंद कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण केली. आपल्या मेहनतीच्या बळावर वैष्णवीने बारावीत ९२ टक्के गुण मिळवून नीटमध्ये पहिल्याच प्रयत्नात यशोशिखर गाठले. तिने ओबीसींमध्ये देशातून ४४ वा क्रमांक पटकाविला.

वैष्णवीसह पाच विद्यार्थी उत्तीर्णच्ंद्रपूर येथील जय हिंद कॉलेजमधील एकूण सहा विद्यार्थी नीटमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. वैष्णवीच्या सोबत इतर पाच जणांनी ६०० च्यावर गुण घेतले आहेत. प्रचंड परिश्रम, जिद्द, चिकाटी असेल तर यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही, हेच वैष्णवीने सिद्ध केले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल