शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

महागाव शहरात रस्ते बांधकामात विहिरीतील दगड-मुरुमाचा वापर

By admin | Updated: April 27, 2016 02:42 IST

महागाव शहरात सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर विहिरीतील माती मिश्रीत मुरुम आणि दगडांची गिट्टी वापरली जात आहे.

गुणवत्तेचे तीनतेरा : जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्षमहागाव : महागाव शहरात सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर विहिरीतील माती मिश्रीत मुरुम आणि दगडांची गिट्टी वापरली जात आहे. या प्रकाराकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून कामाची गुणवत्ताही ढासळत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग १५ लाख रुपये खर्च करून शहरात डांबरी रस्ते तयार करीत आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी शासकीय नियमाला तडे दिले जात आहे. माती मिश्रीत मुरुम आणि विहिरीतील दगड-मुुरुमाचा वापर केला जात आहे. गतवर्षी शहरातील करण्यात आलेल्या डांबरीकरणाची आठ दिवसात वाताहत झाली होती. त्याच ठेकेदारामार्फत पुन्हा नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महागाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकाही कामाचे ई-टेंडरिंग झाले नाही. सर्व गुणवत्ता गुंडाळून काम सुरू आहे. सदर काम कोणत्या निधीतून आहे, रस्त्याची लांबी-रुंदी किती, काम सुरू कधी होणार, किती दिवसात पूर्ण होणार, यावर येणारा खर्च असा फलकही लावण्यात आलेला नाही. सर्व मोघम सुरू आहे. शासनाचे सर्व नियम बाजूला सारुन डांबरी रस्त्याचे दर्जाहीन काम सुरू असून यामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)गुणवत्ता विभागाचे दुर्लक्षमहागाव तालुक्यात झालेल्या रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहे. अनेक पदाधिकारीच कंत्राटदार असल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ता पूर्णत: ढासाळली आहे. याबाबत कुणी तक्रार केल्यास पदाधिकाऱ्याचे काम असल्याने कुणी लक्षही देत नाही. यामुळे अवघ्या महिन्या दोन महिन्यातच रस्ता बांधकाम उखडलेले दिसून येते. याबाबत गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु हा विभागही या रस्त्याची पाहणी करून कारवाई करीत नाही.