शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

गाळेधारकांना नगरविकासची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:33 IST

येथील गांधी चौकात पालिकेने बांधलेल्या गाळ्यांच्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाने १६० व्यापाऱ्यांना नोटीस बजावली असून येत्या २८ फेब्रुवारीला गुरूवारी नगरविकास मंत्रालयात येऊन आपली बाजू मांडण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे१६० व्यापारी : गुरुवारी मुंबईत बाजू मांडण्याची नोटीसद्वारे सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील गांधी चौकात पालिकेने बांधलेल्या गाळ्यांच्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाने १६० व्यापाऱ्यांना नोटीस बजावली असून येत्या २८ फेब्रुवारीला गुरूवारी नगरविकास मंत्रालयात येऊन आपली बाजू मांडण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.सदर गाळ्यांच्या लिलावासंदर्भात नगरसेवक पी.के.टोंगे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आठ आठवड्यांमध्ये सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने नगरविकास मंत्र्यांना दिले होते. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाने वणीतील १६० गाळेधारक व्यापाऱ्यांसह पी.के.टोंगे तसेच पालिकेच्या मुख्याधिकाºयांना नोटीस बजावली आहे. ब्रिटीश सरकारने वणी नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे, यासाठी २५ हजार चौरस फूट जागा दिली होती. या खुल्या जागेवर पालिकेने गाळे उभे करून ते भाडे तत्वावर दिले होते. मात्र या विषयात पी.के.टोंगे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.नगरविकास मंत्रालयाने न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात नव्याने सुनावणी सुरू केली आहे. न्यायालयाने आखून दिलेल्या कालावधीतच नगरविकास मंत्रालयाला सुनावणीची कारवाई पूर्ण करावयाची आहे. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीदरम्यान स्वत: व्यापारी किंवा त्याच्या प्रतिनिधीला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपस्थित न राहिल्यास एकतर्फी निर्णय दिला जाईल, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. वणी नगरपालिकेने नगरविकास मंत्रालयाचा हा आदेश सर्व संबंधित व्यापाºयांपर्यंत पोहोचविला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हे व्यापारी संकुल वादग्रस्त ठरले आहे. काही व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला अंधारात ठेऊन आपसी विक्रीपत्र करून घेतले आहे. अनेक गाळेधारक सध्या हयातदेखिल नाहीत. अनेक व्यापाºयांनी स्वत:च्या अधिकारात गाळ्यांवर आणखी बांधकाम केले. यासाठी परवानगी घेतली का, हा चौकशीचा भाग आहे. नगरविकास मंत्रालयाच्या नोटीसमुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या विषयात आता निर्णय कुणाच्या बाजूने लागतो, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. सदर गाळे हे ब्रिटीशकालीन आहेत.