शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

विनापरवाना स्कूल बस रस्त्यावर

By admin | Updated: March 13, 2015 02:31 IST

तालुक्यासह गावागावात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली.

उमरखेड : तालुक्यासह गावागावात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली. मात्र बहुतांश स्कूल बस विना परवाना रस्त्यावर धावत असून यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. पालकांचेही दुर्लक्ष होत असून परिवहन विभागही कारवाई करताना दिसत नाही. उमरखेड शहरासह ढाणकी, मुळावा, बिटरगाव, दराटी, ब्राम्हणगाव, विडूळ, पोफाळी यासह अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी या शाळांनी स्कूल बस सेवा सुरू केली आहे. घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना नि:शुल्क नेले जात असल्याने अनेक पालक या शाळांकडे आकर्षित झाले आहे. मात्र या स्कूल बसमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा दिसत नाही. पालकही खातरजमा करीत नाही. केवळ नि:शुल्क सेवा मिळते ना असे म्हणत गप्प असतात. अवैध प्रवासी वाहन आणि स्कूल बसमध्ये तसा फारसा फरक नसतो. उमरखेड परिसरातील शेकडो विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळात स्कूल बसने जातात. ६ ते १० आसने छोट्या वाहनावर स्कूल बस लिहून विद्यार्थ्यांना प्रवास घडविला जातो. अनेकदा वाहनांवर अप्रशिक्षित चालक दिसून येतात. कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी अक्षरश: कोंबले जातात. काही वर्षापूर्वी अमरावती येथे स्कूल बसला अपघात झाला होता. त्यात चिमुकल्यांचा जीव गेला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या परिवहन विभागाने कठोर नियम केले. सुरुवातीला या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. परंतु आता सर्व नियम धाब्यावर बसवून खुलेआम विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते.राज्य शासनाच्या नियमानुसार परिवहन विभागाकडून स्कूल बसला बॅच क्रमांक दिला जातो. परंतु उमरखेड शहरातील अनेक स्कूल बस चालकांकडे बॅच क्रमांक आणि परवाना आढळून येत नाही. स्कूल बसवर अनेकदा शाळेचे नावही लिहिलेले नसते. बिचाऱ्या चिमुकल्यांना बसवायचे आणि शाळेत आणायचे असा काहीसा प्रकार सुरु आहे. पोलीस, परिवहन विभागाला याचे कोणतेही सोयरसूतक नाही. (शहर प्रतिनिधी)