शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी बाजार समितीचा नियोजनशून्य कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

बाजार समितीत एकूण १८ संचालक आहे. त्यात राष्ट्रवादीचे आठ, काँग्रेसचे पाच, भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि प्रक्रिया संस्थेचा एक ...

बाजार समितीत एकूण १८ संचालक आहे. त्यात राष्ट्रवादीचे आठ, काँग्रेसचे पाच, भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि प्रक्रिया संस्थेचा एक संचालक आहे. माजी आमदार ख्वाजा बेग यांच्या मार्गदर्शनात विद्यमान पदाधिकारी सत्तारुढ झाले. मात्र गेल्या साडेचार वर्षात त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. सहा महिन्यांपूर्वी टीएमसी यार्डमध्ये गोदाम व चाळणीगृह उभारण्यात आले. त्याचे अद्यापही लोकार्पण झाले नाही. निष्क्रिय व अनुभवशून्य कर्मचाऱ्याला प्रभारी सचिवपदाचा कारभार देण्यात आला. तब्बल १४ संचालकांचा विरोध असतानाही सभापती हेकेखोरपणे काम करीत असल्याचा आरोप होत आहे.

विद्यमान पदाधिकारी शेतकरी हिताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र साडेचार वर्षांत शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. माजी आमदारांनीही त्याकडे डोळेझाक केली. परिणामी संचालकांमध्ये असमन्वय निर्माण झाला. शेतकरी हिताचे निर्णय दूर राहिले.

बाॅक्स

माजी आमदारांनी लक्ष देण्याची गरज

माजी आमदार ख्वाजा बेग यांनी बाजार समितीवर लक्ष केंद्रित केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यांनी सभापती व संचालक मंडळाला वठणीवर आणण्याची गरज आहे.

कोट

नवीन यार्डमध्ये धान्यगृह तयार केले. मात्र कंत्राटदाराने वीज सुविधा उपलब्ध करून दिली नाही. काम अर्धवट आहे. त्यामुळे त्याची रितसर सुरुवात करता आली नाही. तथापि या गोदामात धान्य ठेवले जात आहे.

- राजेंद्र पाटील

सभापती, बाजार समिती, आर्णी