शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात दर्जाहीन कामांचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:14 IST

शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.

ठळक मुद्देथातुरमातूर कामे : कामाच्या गुणवत्तेवरून ओरड, जनतेच्या पैशाची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.मारेगाव शहरातील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळताच शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी नगरपंचायत प्रशासनाला प्राप्त झाला. या पैशातून शहरातील विकासकामांना नगरपंचायत प्रशासनाने सुरूवात केली. नगरपंचायत प्रशासनाने सुरूवातीच्या काळात कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले. परंतु हळूहळू गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत भराभर कामे उरकवून निधी उचलण्याचा सपाटाच सुरू केला आहे. आज शहरातील अनेक वॉर्डात खासगी कंत्राटदार व बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. यासंदर्भात कंत्राटदारांना विचारणा केल्यास ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या’ अशा प्रकारचे उद्धट व अरेरावीची भाषा जनतेसोबत वापरली जाते.वॉर्ड क्रमांक एकमधील नगरसेवक उमा देवगडे यांनी आपल्या वॉर्डातील बोगस कामाबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता, त्यांनाही तसेच उत्तर देण्यात आले. शहरातील प्रत्येक कामाची तक्रार नगरपंचायतीकडे होत असताना नगरपंचायत प्रशासन जतनेच्या तक्रारीची दखलच घेत नाही. उलट कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न करता त्यांची बिले अदा केली जात आहे.आता तर शहरातील अनेक कामे ज्या कंत्राटदाराला देण्यात आली तो ती कामे न करता दुसऱ्याकडून कामे करून घेऊन बिले काढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे प्रभारावरच सर्व कामे सुरू आहे. प्रशासन व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. याकडे आता वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.अनावश्यक ठिकाणी कामेशहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्ते आणि नाली बांधकामाची मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष करून ज्याठिकाणी रस्ता व नालीची आवश्यकता नाही, अशा ठिकाणी थातुरमातूर कामे करून केवळ बिले काढली जात आहे.कार्यालयीन कामेही खोळंबलीनगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे दीर्घ रजेवर गेल्याने आणि प्रभारी मुख्याधिकारी येत असल्याने जनतेची अनेक महत्वाची कामे होत नाही. नागरिक कामासाठी नगरपंचायत कार्यालयात गेल्यावर अर्धेअधीक कर्मचारी गैरहजर असतात. जे कर्मचारी उपस्थित राहतात, ते ‘साहेब नाही त्यामुळे तुमची कामे होणार नाही’ असे उत्तर देतात. त्यामुळे नागरिक कमालिचे हैराण झाले आहेत.