शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:05 IST

सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने कळंब तालुक्यातील तासलोट गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाणीदार गावासाठी सामूहिक प्रयत्न, गुणतालिकेत तासलोट गाव राज्यात अव्वल

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने कळंब तालुक्यातील तासलोट गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे.खऱ्या अर्थाने या गावाने ८ एप्रिलच्या रात्री १२ वाजतापासून अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जल व्यवस्थापन करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला कैलास टेकाम, सुभाष टेकाम, अनिल टेकाम, महादेव मेश्राम यांनी स्पर्धेसंबधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गावातील लोकांना एकत्र करीत गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला. विशेष म्हणजे ८६ लोकांची वस्ती असलेल्या या गावात केवळ २१ कुटुंब संख्या आहे. गावातील मोजके जण शेती तर इतर सर्व रोजमजुरी करुन उध्दरनिर्वाह करतात. सकाळी ६ ते दुपारी २ या वेळात आबालवृध्दांसह सर्व गाव जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फूर्तीने उतरला आहे.या गावात सी.सी.टी., एल.बी.एस., कँटूर बांध, ग्रेडेड कँटून बांध यासह इतरही कामे उत्कृष्ठ व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण केले आहे. त्यामुळे तासलोट हे गाव महाराष्ट्रात गुणतालिकेत अव्वल आहे.बीडीओंच्या प्रोत्साहनाने उत्साहगावे पाणीदार व्हावी यासाठी गटविकास अधिकारी सुशिल संसारे पुढे सरसावले आहे. बहुतांश वेळ गावकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात ते घालवित आहे. आज त्यांनी तासलोट येथे सहपरिवार, कर्मचारी व नागरिक अशोक उमरतकर, मुरलीधर नाईक, देवेंद्र पडोळकर, रवींद्र गावंडे, अमोल तायडे, स्मिता ठाकरे, विजय चव्हाण, सुमन नेवारे, अलका गारोडे, कीर्ती चिचाणे यांच्यासह श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले.अपंग व्यक्तीचे श्रमदान सर्वांना ऊर्जा देणारेलक्ष्मी बापूराव टेकाम ही महिला दोनही हाताने पूर्ण अपंग आहे. त्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. त्यांच्यापासून लोकांनाही आपसूकच प्रेरणा मिळते. एक अपंग महिला मेहनत करू शकते तर आपण का नाही, अशी भावनाही यानिमित्ताने अनेकांच्या मनात जागृत झाली आहे. या उपक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी आहेत.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा