शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! पुतण्याच्या वरातीआधीच निघाली काकांची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 20:25 IST

Yawatmal News शुक्रवारी पुतण्याला हळद लागली आणि शनिवारी पहाटे मोठ्या वडिलांचा मृत्यू झाला. पुतण्याच्या वरातीआधीच मोठे वडील गेल्याने लग्नघरी शोककळा पसरली.

यवतमाळ : नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे खवले कुटुंबात मुलाचे लग्न ठरले होते. ११ जून रोजी नेर येथे लग्न सोहळा होणार होता. मात्र, शुक्रवारी पुतण्याला हळद लागली आणि शनिवारी पहाटे मोठ्या वडिलांचा मृत्यू झाला. पुतण्याच्या वरातीआधीच मोठे वडील गेल्याने लग्नघरी शोककळा पसरली.

वासुदेवराव खवले (७३) असे काळाने झडप घातलेल्या मोठ्या वडिलांचे नाव आहे. वासुदेवराव यांचे लहान बंधू मुरलीधरराव खवले यांचा मुलगा राहुल याचे नेर येथील फोपसे कुटुंबातील मुलीशी लग्न जुळले होते. रविवार ११ जून रोजी नेर येथील एका मंगल कार्यालयात लग्नाचा मुहूर्त निघाला होता. त्यामुळे गुरुवारपासूनच खवले यांच्या लग्नघरी आनंदात तयारी सुरू होती. पाहुण्यांचे आगमन सुरू झाले होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना शुक्रवारी वर राहुल याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. मोठ्या उत्साहाने नातेवाईक हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रात्री उशिरा सर्वजण झोपी गेले. मात्र, शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास आक्रित घडले.

पहाटेच्या सुमारास वर राहुल याचे मोठे वडील वासुदेवराव खवले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक जागे झाले. मात्र, काही कळायच्या आतच वासुदेवराव यांनी जगाचा निरोप घेतला. पुतण्याची वरात निघण्याच्या आदल्या दिवशीच त्यांची अंत्ययात्रा काढण्याची वेळ खवले कुटुंबावर ओढवली. घरात मंगल कार्य असल्याने नातेवाईक व कुटुंबीयांनी या दु:खाच्या प्रसंगात शनिवारीच मोठ्या जड अंत:करणाने वासुदेवराव यांचा अंत्यविधी पूर्ण केला. लग्न ठरले असल्याने नाईलाजाने शनिवारी सर्व विधी पूर्ण करावे लागले. मात्र, वासुदेवराव यांच्या निधनाने संपूर्ण खवले कुटुंब आणि नातेवाइकांवर दु:खाचा पहाड कोसळला. 

साधेपणाने होणार विवाहवासुदेवराव खवले यांचे निधन झाल्याने रविवार ११ जून रोजी अत्यंत साधेपणाने नेर येथे लग्नविधी पूर्ण करण्याचा निर्णय खवले आणि फोपसे कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यानुसार रविवारी नियोजित मुहूर्तावर लग्नाचे विधी केले जाणार आहेत. वासुदेवराव यांनाही एकुलता एक कैलास नामक मुलगा आहे. वासुदेवराव एसटी महामंडळामध्ये वाहकाची सेवा करून निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनामुळे राहुलच्या विवाहासाठी सांगितलेला बॅन्डबाजा रद्द करण्यात आला. वरातही न काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यू