शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी घटना... झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By विलास गावंडे | Updated: September 17, 2023 14:25 IST

डोंगरखर्डातील घटना : जनावरांसाठी चारा तोडताना कोसळले

विलास गावंडे, डोंगरखर्डा (यवतमाळ) : जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास डोंगरखर्डा (ता.कळंब) येथे घडली. रामा पांडुरंग ठाकरे (५१), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.  या शेतकऱ्याकडे सात एकर शेती आहे. सोबत त्यांनी शेळ्याही पाळल्या आहे. चारा आणण्याकरिता ते सकाळीच लगतच्या शेतशिवारात गेले. झाडावर चढून चारा तोडत असताना खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकाराची माहिती होताच त्यांना मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यवतमाळ येथे हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शासकीच रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

शेतीसोबतच ते शेळीपालनही करत होते. शिवाय हॉटेलमध्ये भट्टीमास्तर म्हणून काम करायचे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह होता. मेहनती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या मागे मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. रामा यांच्या अपघाती मुत्यूमूळ या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ