शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

गावातल्या बेरोजगारांना गावातच मिळणार रोजगाराचे धडे; शिवराज्याभिषेक दिनी प्रारंभ  

By अविनाश साबापुरे | Updated: May 22, 2023 19:19 IST

ग्रामपंचायतींमध्ये हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार असून त्याचे उद्घाटन येत्या शिवराज्याभिषेकदिनी म्हणजे ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : काम करण्याची इच्छा आहे. पण, आमच्या खेड्यात संधीच नाही. अन् गाव सोडून दूर जाण्याची तयारी नाही, अशी अनेक तरुणांची परिस्थिती आहे. पण, यावरही आता तोडगा निघणार आहे. गावातल्या बेरोजगारांना गावातच स्वयंरोजगाराचे, छोट्या उद्योगाचे धडे मिळणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार असून त्याचे उद्घाटन येत्या शिवराज्याभिषेकदिनी म्हणजे ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील निवडक ५०० ग्रामपंचायतींमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. ‘कौशल्यपूर्ण भारत’ ही पंतप्रधानांची संकल्पना साकारण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये ‘कौशल्य विकास कार्यक्रम’ राबविण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. त्यानुसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सर्व सरपंचांना पत्र पाठवून या उपक्रमात सहभागाचे आवाहन केले होते. प्रत्यक्ष ग्रामपंचायतींकडूनच या उपक्रमात सहभागी होण्याचे प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे मागविण्यात आले होते. त्यातून आता ग्रामपंचायतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता ५०० ग्रामपंचायतींमध्ये तज्ज्ञांमार्फत गावातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोणते अभ्यासक्रम शिकविणार ?या कार्यक्रमात बेरोजगारांना टेलरिंग, डेअरी फार्मर, नाश्त्याचा व्यापार (ट्रॅडिशनल स्नॅक ॲण्ड सॅव्हरी मेकर), बीज प्रक्रिया कामगार, रेशीमशास्त्रज्ञ (सेरीकल्चरिस्ट), ऑटोमोटिव्ह इंजिन रिपेअर टेक्निशिअन, शेळी पालन, लाकूड काम (टिंबर ग्रोव्हर), पेस्टीसाइड ॲण्ड फर्टिलायझर अप्लीकेटर, पोल्ट्रीफार्म वर्कर, अगरबत्ती बनविणे, किसान ड्रोन ऑपरेटर, ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर, इरिगेशन सर्व्हिस टेक्नीशिअन, टूव्हीलर सर्व्हिस असिस्टंट, ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक, पिकल मेकिंग टेक्निशिअन आदी १७० अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. इयत्ता चौथी उत्तीर्णपासून तर पदवीधारक, बीई झालेल्या तरुणांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम राहणार आहेत. तर, केवळ लिहिता वाचता येणाऱ्या नागरिकांसाठीही काही अभ्यासक्रम राहणार आहेत. यवतमाळच्या २० गावांत होणार प्रशिक्षणयवतमाळ जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आर्णी तालुक्यातील जवळा, बाभूळगावातील राणीअमरावती, दारव्ह्यातून लाडखेड, दिग्रसमधून कलगाव, घाटंजीतून खापरी आणि पारवा, कळंबमधून जामडोह, पांढरकवड्यातून पाटणबोरी, महागावातून काळी दौ., मारेगावातून वेगाव, नेरमधून सोनवाढोणा व इंद्रठाणा, पुसदमधून शेंबाळपिंपरी, राळेगावातून झाडगाव, उमरखेडमधून मुळावा, वणीतून चिखलगाव, तर यवतमाळ तालुक्यातून तिवसा व हातोला या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले. ते प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले. जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींची या कार्यक्रमासाठी निवड झाली असून लवकरच राज्यस्तरीय उद्घाटन होणार आहे. - विद्या शितोळे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ