शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भूमिगत वीज जोडण्या जीवावर उठल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:27 IST

वीज वितरण कंपनीचा कारभार यवतमाळकरांच्या जीवावर उठणारा आहे. येथील आर्णी मार्गावर विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. त्यानंतरही वीज कंपनीने अथवा कंत्राटदारांनी धडा घेतला नाही. अनेक भागात वीज कंपनीने लावलेल्या फ्यूज पेट्या सताड उघड्या आहे. जमिनीवरच या पेट्या असल्याने खेळताना लहान मुले, मोकाट जनावर याचा सहज स्पर्श होऊ शकतो. या जटील समस्येकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देफ्यूज नसलेल्या पेट्या उघड्या : पावसाचे पाणी साचल्याने अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीचा कारभार यवतमाळकरांच्या जीवावर उठणारा आहे. येथील आर्णी मार्गावर विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. त्यानंतरही वीज कंपनीने अथवा कंत्राटदारांनी धडा घेतला नाही. अनेक भागात वीज कंपनीने लावलेल्या फ्यूज पेट्या सताड उघड्या आहे. जमिनीवरच या पेट्या असल्याने खेळताना लहान मुले, मोकाट जनावर याचा सहज स्पर्श होऊ शकतो. या जटील समस्येकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येते.शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरची वीज जोडणी भूमिगत करण्यात आली. शिवाय अनेक नागरी वसाहतीमध्ये भूमिगत वीज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. श्रीकृष्णनगर, दर्डानगर येथील अगदी जमिनीवर असलेल्या फ्यूज पेट्या उघड्या आहे. या परिसरातूून सकाळी व दुपारनंतर शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या फ्यूज पेट्या थेट अपघाताला आमंत्रण देत आहेत. विशेष म्हणजे येथे किटकॅटमध्ये एकही फ्यूज नाही. तेथे फ्यूजसाठी तांब्याची तार वापरण्याऐवजी थेट अर्थिंग तारचा वापर फ्यूज म्हणून केला आहे. कुठे वीजपुरवठा शॉट झाल्यानंतरही येथील फ्यूज उडणार नाही, अशी स्थिती आहे. अगदी जमिनीवरच या पेट्या असल्याने अनावधानाने जरी त्याला स्पर्श झाला तरी थेट इहलोकीचा प्रवास सुरू होतो.आर्णी मार्गावर दुभाजकामध्ये जिवंत विद्युत प्रवाहाची केबल उघडी होती. याचा स्पर्श होऊन बांधकाम ठेकेदाराचा मत्यू झाला होता. आता पुन्हा तिच चूक केली जात आहे. शहरातील बहुतांश भागात अशा भूमिगत वीज जोडणीच्या पेट्या लागल्या आहेत. दर्डानगर -श्रीकृष्णनगर चौफूलीवर असलेल्या पेटीचे दार उघडे असून वीज तारा उघड्या पडल्या आहेत. याकडे ताताडीने लक्ष देऊन त्याला तत्काळ बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.