शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात होणार भूमिगत गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:44 IST

नगरपरिषद क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देप्राथमिक सर्वेक्षण : ८१ चौरस किलोमीटरचा परीघ, पथकाकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषद क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. अहमदाबादच्या केंद्र सरकार नियुक्त कन्संलटन्सीच्या दोन अभियंत्यांनी सर्वेक्षणासाठी लागणारी जुजबी माहिती घेतली.नगरपरिषदेने ‘अमृत’ योजनेतंर्गत २४ तास पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजनेला प्राधान्य दिले. यात बेंबळा प्रकाल्पातून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. आता भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातर्फे ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अमृत योजनेतून आर्थिक तरतूद करण्यात आली. या योजनेच्या कामाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.पालिकेचे विस्तारीत क्षेत्र ८१.५० चौरस किलोमीटर आहे. या संपूर्ण परिसरात ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अहमदाबाद येथील कन्सलटंन्सीच्या दोन अभियंत्यांनी शहराची लोकसंख्या, भौगोलिक रचना आदींची माहिती घेतली. त्यावरून तयार आराखड्यानुसार संपूर्ण शहराचा ‘मायक्रो सर्व्हे’ केला जाणार आहे. त्याकरिता अहमदाबादच्या कन्सलटन्सीची संपूर्ण टीम यवतमाळात येणार आहे. आक्टोबर महिन्यात योजनेच्या अंतिम सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. या योजनेसाठी शहरात सातही दिवस पाणीपुरवठा असणे आवश्यक आहे. ही समस्या बेंबळा प्रकल्पातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे सुटणार आहे. त्यात तब्बल ३० टक्के पाणी यवतमाळसाठी आरक्षित आहे.दोन्ही योजनांचा लाभनिळोणा, चापडोह या मध्यम प्रकल्पासह आता बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलद्ध झाल्याने शहराची पाणीटंचाईची समस्या येत्या काही वर्षात सुटण्याची शक्यता आहे. त्याला पूरक भूमिगत गटारी योजना कार्यान्वीत झाल्यास, या दोन्ही योजनांचा लाभ यवतमाळकरांना एकाचवेळी घेता येणार आहे.या योजनेसाठी निधीची कमतरता पडणार नाही. निर्धारित काळात काम करणाºया कंपन्या निवडल्या असून त्यांच्याकडूनच भूमिगत गटार योजनेचा डीपीआर तयार केला जाणार आहे. एकाच वेळी संपूर्ण शहरात काम न करता झोनप्रमाणे सुरूवात करण्याचे निर्देश दिले.- मदन येरावार,पालकमंत्री यवतमाळ