शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कृषी फिडरवर अघोषित भारनियमन कायमच

By admin | Updated: September 17, 2015 03:11 IST

कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे.

शेतकरी हवालदिल : ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले यवतमाळ : कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस असला तरी पीक स्थिती उत्तम आहे. हवा तेव्हा आणि हवा तसा पाऊस कोसळल्याने सोयाबीन आणि कपाशीचे पीक चांगलेच बहरले आहे. मात्र गत महिनाभरापासून पावसाने दडी मारली. उन्ह उन्हाळ्यासारखे तापत आहे. अशा स्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र कृषी फिडरवर अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ओलित करणे अशक्य झाले. याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना माहिती दिली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री राठोड यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची मुंबईत भेट घेऊन जिल्ह्यातील विजेची समस्या सांगितली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी महिनाभर २४ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र हा शब्द पाळलाच गेला नाही. आजही कृषी फिडरवर तब्बल १६ तासांचे अघोषित भारनियमन होत आहे. शेतकरी आक्रमक झाले असून गावागावातील शेतकरी आता वीज वितरणवर धडकत आहे. वीज वितरणमध्ये तक्रारींचा पाऊस पडत आहे. परंतु त्यानंतरही भारनियमन जैसे थेच आहे. जिल्ह्यात तीन दिवस दिवसा आणि इतर दिवस रात्री वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक आजही कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. (शहर वार्ताहर)