शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

आर्णीत शिक्षकांचे बेमुदत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:55 IST

गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नक्षलभत्त्याची रक्कम पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे येथील पंचायत समितीसमोर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देमाघार नाही : राजुदास जाधव यांचा इशारा, विविध मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नक्षलभत्त्याची रक्कम पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे येथील पंचायत समितीसमोर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन मागे घेणार नसल्याची घोषणा संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी केली आहे.जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना १५ टक्के किंवा दीड हजार रूपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. हा भत्ता गेल्या नऊ वर्षांपासून एकाच रकमेवर स्थीर ठेवण्यात आला होता. शिक्षक संघाने नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह नक्षलभत्ता अदा करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाचे आदेश असूनही जिल्हा परिषद प्रशासनाने भत्ता देण्यास टाळाटाळ केली. अखेर संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेने पंचायत समितीला थकबाकीची रक्कम उपलब्ध करून दिली. त्याला दीड महिना लोटूनही शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही.आता शिक्षक संघाने नक्षलभत्ता थकबाकी व दोन महिन्यांचे वेतन तत्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. जोपर्यंत थकबाकीची रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा राजुदास जाधव यांनी दिला. उपोषण मंडपाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, सभापती सूर्यकांत जयस्वाल आदींनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता त्यांनी हा इशारा दिला. या उपोषणात कार्याध्यक्ष सुरेश पवार, सचिव गजानन ठाकरे, बबन मुंडवाईक, नुरूल्ला खान, विश्वंभर उपाध्ये, रवी चिद्दरवार, महेश ुदुल्लरवार, आसाराम चव्हाण, सुधीर कोषटवार, सुनील लिंगावार, रामप्रकाश पवार, संदीप जाधव, राहुल गजभिये, भास्कर डहाके, ईश्वर चव्हाण, विनोद शिंदे, शमशोद्दीन भाटी, पवन राऊत आदी शिक्षक सहभागी झाले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक