शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

उमरखेडमध्ये अनधिकृत बोअरवेलचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:51 IST

उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेलचा व्यवसाय जोमात सुरू आहे. परराज्यातून भाडेतत्त्वावर मशीन आणून कमिशनपोटी अनेकांनी अनधिकृत खोदकाम सुरू केले आहे.

ठळक मुद्देपर्यावरण विभागाचे दुर्लक्ष : पालिकेसह ग्रामपंचायतींचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेलचा व्यवसाय जोमात सुरू आहे. परराज्यातून भाडेतत्त्वावर मशीन आणून कमिशनपोटी अनेकांनी अनधिकृत खोदकाम सुरू केले आहे.पाण्याची पातळी खालावल्याने ४०० ते ५०० फुटापर्यंत जमिनीत बोअर करण्यात येत आहे. पर्यावरण विभागाच्या नियमांची पायमल्ली हात असतानाही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. शासन आदेशानुसार मर्यादेपेक्षा अधिक खोलवर बोअर करणे गुन्हा आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून उमेदवारांकडून मतदारांना बोअर मारून देण्याचे प्रलोभन दाखविण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोअरवेल मशीन निवडणूक आयोगाच्या रडारवर राहणार आहे. निवडणूक होईपर्यंत किमान या प्रकारावर पायांबद घालण्याची मागणी होत आहे.त्याच प्रमाणे रस्त्याची वजन भार मर्यादा तेवढीच महत्वाची आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची बोअरवेल मशीनच्या रहदारीने चाळणी होत आहे. एरवी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोड वाहनांवर दंड ठोठावण्यात येतो. परंतु बोअरवेल वाहनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या गैरप्रकाराबाबत स्थानिक ग्रामपंचायती आणि उमरखेड नगरपालिकाही दुर्लक्ष करीत आहे.विनापरवाना बोअरवेलचा आडोसा घेऊन मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल लपविली जात आहे. निवडणूक काळात परराज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांच्या माध्यमातून तालुक्यात अनधिकृतरित्या पैसा पसरविला जात असल्याची शंका आहे. अनेक गावांमधील बोअरवेल एजंटच्या हालचाली बघता हा संशय अधिक बळावत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणी