शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शिक्षकांना आता २० टक्के पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 10:48 IST

एक तपापेक्षा अधिक काळ विनावेतन ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर यावर्षीच्या दिवाळीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हाती २० टक्के पगार पडणार आहे.

ठळक मुद्दे१२ वर्षांनंतर मोबदलादिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आदेश

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एक तपापेक्षा अधिक काळ विनावेतन ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर यावर्षीच्या दिवाळीला शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हाती २० टक्के पगार पडणार आहे. तसे पत्र शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना पाठविले आहे.१५ वर्षांपूर्वी राज्यात हजारो कायम विनाअनुदानित शाळांची खैरात वाटली गेली. भविष्यात केव्हा तरी वेतन सुरू होईल या आशेने लाखो शिक्षक व कर्मचाºयांनी या शाळांमध्ये नोकरी पत्करली. सतत संघर्ष केल्यानंतर शासनाने कायम अनुदानित मधला कायम शब्द काढून घेतला. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शासनाने या विनाअनुदानित शाळांना काही निकष लावून त्यांची अनुदानासाठी पात्रता तपासण्याचे ठरविले. सर्व शाळांची निकषानुसार तपासणी करण्यात आली. मात्र या निकषात फारच थोड्या शाळा पात्र ठरल्या. अशा शाळांना तीन वर्षांपूर्वी शासनाने २० टक्के अनुदान सुरू केले. मात्र बहुसंख्य शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या. त्यामुळे सुटलेल्या शाळांतील शिक्षकांच्या तोंडचे पाणी पळाले. मग अशा शाळांतील शिक्षक व कर्मचाºयांनी कृती समिती तयार करून लढा उभारला. निकषातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी रेटून धरली. शासनानेही दोन पावले माघार घेऊन जाचक अटी शिथील केल्या. मग अशा उर्वरित शाळा १ व २ जुलै २०१७ च्या शासन निर्णयान्वये २० टक्के अनुदानास पात्र ठरविण्यात आल्या. मात्र वर्ष लोटूनही या शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन काढण्याचे आदेश निघाले नाही. तेव्हा कृती समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. शिक्षक व पदवीधर आमदारांनी शिक्षकांची बाजू शासनाला पटवून दिली. तेव्हा शासनाने दखल घेऊन या शिक्षकांना न्याय दिला. संचालकांनी सर्व शिक्षणाधिकारी व वेतनपथक अधीक्षकांना पत्र पाठवून शाळांची तपासणी करून दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यास सुचविले आहे.शाळांना हवे १०० टक्के अनुदानविनाअनुदानित शाळा निकषांमध्ये पात्र ठरल्यास पाचव्या वर्षी २० टक्के अनुदान व नवव्या वर्षी १०० टक्के अनुदान देण्याची तरतूद केली होती. मात्र या शाळांना १२-१५ वर्षे होऊनही त्यांची २० टक्के अनुदानातच बोळवण केली जात आहे. पुढचा ४० टक्केचा टप्पासुद्धा अजून शिक्षकांना मिळाला नाही. पात्र शाळांना १०० टक्के वेतन अनुदान सुरू करावे, अशी शिक्षकांची आर्त मागणी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक