लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शासनाने विम्यातून सोयाबीन आणि कपाशी या मुख्य पिकांना वगळले. या दोन्ही पिकांचा पीक विम्यात समावेश करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.२०१८-१९ मध्ये तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला. मात्र शेतकºयांना विम्याचा लाभ मिळाला नाही. तालुक्यात ज्वारी पिकाचा पेरा नगण्य असूनही ज्वारीलाच विमा लागू केला. मुख्य पीक कपाशी व सोयाबीनला विम्यातून वगळले. यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले.सोयाबीन व कापूस पिकांना मागील वर्षातील विमा लागू करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाजार समितीच्या संचालकांनी निवेदनातून केली. नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे, उपसभापती दगडू चव्हाण, संचालक अॅड.बाळासाहेब नाईक, शामराव वानखेडे, राधेश्याम भट्टड, जय नारायण नरवाडे, संतोष जाधव, अजमतखाँ अमीरखाँ, सचिव सुधीर शिंदे उपस्थित होते.
उमरखेड बाजार समिती संचालक मंडळाचे एसडीओंना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 22:14 IST
शासनाने विम्यातून सोयाबीन आणि कपाशी या मुख्य पिकांना वगळले. या दोन्ही पिकांचा पीक विम्यात समावेश करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
उमरखेड बाजार समिती संचालक मंडळाचे एसडीओंना निवेदन
ठळक मुद्देविमा भरपाई द्या : सोयाबीनचा समावेश करा