शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुका बनला कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

तालुक्यातील तलाठी, पंचायत समितीचा शिपाई व भाजपाचा एक कार्यकर्ता पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमदारांनी खबरदारी म्हणून रविवारी आपले स्वॅब तपासणीला दिले. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १२७ झाली. त्यापैकी ८२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. ४२ जणांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत पाच जणांचे बळी गेले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरविवारी २५ रुग्ण : शहरासह ढाणकी, विडूळलाही झटका, नागरिक, पदाधिकाऱ्यांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पांढरकवडा आणि पुसदमध्ये सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आता उमरखेड तालुका कारोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे दिसून येत आहे. रविवारी तब्बल २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.सुरुवातीच्या तीन महिन्यात उमरखेड शहर व तालुक्यात कोरोनाचे नाममात्र रुग्ण होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जावून आलेल्या धानोरा (साचलदेव) येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. शहरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांलाही लागण झाली होती. त्यांचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तुरळक प्रमाणात नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट सुरू झाला आहे. शनिवारी तब्बल २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रविवारी आणखी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात उमरखेड शहरातील १८, ढाणकी येथील सहा आणि विडूळ येथील एका नागरिकाचा समावेश आहे.शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यापूर्वी शहर व ढाणकी येथील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला होता. तरीही कोरोनाची साखळी तोडण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. तालुक्यातील मरसूळ येथील कोविड सेंटरमध्ये दररोज नागरिकांची तपासणी केली जात आहे. पंचायत समितीमधील दोन कर्मचारी व एका पदाधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पंचायत समिती कार्यालय सील करण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा चक्रावली आहे.ग्रामसेवक, रोजगार सेवकांची तपासणीपंचायत कर्मचारी व पदाधिकारी पॉझिटिव्ह आल्याने आता तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व रोजगार सेवकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय पंचायत समिती प्रशासनाने घेतला आहे. पंचायत समितीत विविध बैठकांच्या निमित्ताने तालुक्यातील ग्रामसेवक, रोजगार सेवक येत असतात. त्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊनच तातडीने ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.आमदारांनी दिला स्वॅबतालुक्यातील तलाठी, पंचायत समितीचा शिपाई व भाजपाचा एक कार्यकर्ता पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमदारांनी खबरदारी म्हणून रविवारी आपले स्वॅब तपासणीला दिले. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १२७ झाली. त्यापैकी ८२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. ४२ जणांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत पाच जणांचे बळी गेले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. प्रशासन उपाययोजनांत व्यस्त आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या