शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड, महागावला अखेर ३२ शिक्षक मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:03 IST

गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे.

ठळक मुद्देएकाचा नकार : आज मिळणार आॅर्डर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे.या दोन्ही पंचायत समितीमध्ये शिक्षकांची कमतरता ऐरणीवर आली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इतर तालुक्यातील शिक्षकांना इच्छा असल्यास उमरखेड, महागावमध्ये जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेत इच्छुकांनी विकल्प अर्ज भरले. लगेच त्यांचे समूपदेशनही झाले. त्यानंतर ३२ शिक्षकांना उमरखेड, महागावमधील पसंतीच्या जिल्हा परिषद शाळेत बदली देण्यात आली आहे. यात उमरखेड पंचायत समितीमध्ये १५ तर महागावमध्ये १७ शिक्षकांना पाठविण्यात येणार आहे. तर एका शिक्षकाने ही प्रतिनियुक्ती नाकारली. प्रत्यक्ष बदली आदेश सोमवारी शिक्षकांच्या हाती पडणार आहे. या तातडीच्या प्रक्रियेमुळे किमान ३२ शाळांना तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेकडो शाळांची प्रतीक्षा कायम आहे.कार्यरत शिक्षकांना पदोन्नती देण्याचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. मात्र आधी रिक्त जागा भराव्या आणि त्यानंतर शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी भूमिका जवळपास सर्वच संघटनांनी घेतली आहे. त्याला प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ३२ शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीनेही हा प्रश्न पूर्णपणे सुटण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद