शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाहन झाडावर आदळून लाडखेडचे दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:33 IST

यवतमाळ मार्गावरील बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान भरधाव टाटा एस मालवाहू वाहन झाडावर आदळल्याने येथील दोन तरुण ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदारव्हा रोडवरील घटना : यवतमाळच्या कंपनीत होते कंत्राटी कामगार

लोकमत न्यूज नेटवर्कलाडखेड : यवतमाळ मार्गावरील बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान भरधाव टाटा एस मालवाहू वाहन झाडावर आदळल्याने येथील दोन तरुण ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.उज्ज्वल गजानन दातीर (२१) आणि आशीष ज्ञानदेव नैताम (२२) अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही लाडखेड येथील रहिवासी असून यवतमाळच्या रेमण्ड कंपनीत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होते. रविवारी १२ वाजताच्या सुमारास वाहनाने (एम.एच.३७/जे.१९३८) ते यवतमाळ येथून लाडखेडला येत होते. बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडावर आदळले. यात उज्ज्वल व आशीष गंभीर जखमी झाले. मात्र रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदत मिळाली नाही.रात्री उशिरा त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे पीएसआय राजू दरोडे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनीच जखमींना रुग्णालयात नेले.होतकरूंचा नाहक बळीदोन्ही मृत तरुण गरीब कुटुंबातील होते. परिवाराचा उदरनिर्वाह त्यांच्यावरच अवलंबून होता. उज्ज्वल याचे आई आणि वडील हयात नाही. तो लाडखेड येथे आत्याकडे राहात होता. त्याला एक लहान भाऊ आहे. आशीषसुद्धा कुटुंबातील कर्ता होता. गावात हळहळ व्यक्त होत आहे.