शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जिल्हा परिषदेच्या एकाच रस्त्यावर दोन निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 05:00 IST

खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. २० लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे. पीयूष नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला ही कामे देण्याचा घाट आहे. वास्तविक हा कंत्राटदार ‘सुशिक्षित बेरोजगार अभियंता’ या वर्गवारीत मोडत नसल्याचे सांगितले जाते. तो बहुतांश इतरांच्या नावे कामे करतो. यवतमाळातीलही एका युवतीच्या रजिस्ट्रेशनवर तो आपली कामे करतो.

ठळक मुद्देबांधकाम-२ चा अजब कारभार : पहिल्यांदाच कोल्डमीक्स डांबरीकरणाला मंजुरी, आक्षेप घेणार कोण ?

n  लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : एकाच रस्त्यावर सुधारणा व दुरुस्तीच्या दोन निविदा काढून त्या मंजूरही केल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार  जिल्हा परिषदेच्या बांधकाम  विभाग क्र. २ अंतर्गत उमरखेड तालुक्यात उघडकीस आला आहे. खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. २० लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे. पीयूष नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला ही कामे देण्याचा घाट आहे. वास्तविक हा कंत्राटदार ‘सुशिक्षित बेरोजगार अभियंता’ या वर्गवारीत मोडत नसल्याचे सांगितले जाते. तो बहुतांश इतरांच्या नावे कामे करतो. यवतमाळातीलही एका युवतीच्या रजिस्ट्रेशनवर तो आपली कामे करतो. पीयूषने यापूर्वी पांदण रस्त्यांची तब्बल २७ कामे उमरखेड तालुक्यात केली असून ती बहुतांश गुणवत्तेबाबत संशयास्पद व दुसऱ्याच्या नावे केलेली आहे. त्याने सादर केलेले बहुतांश अंदाजपत्रक सदोष राहते. मात्र दबावतंत्राचा वापर करून आपली कामे मंजूर करून घेतली जात आहे. खरुस ते उंचवडद या रस्त्यावर आधीच ८० व ४० एमएम थर देण्याचे काम झालेले असताना पुन्हा त्याचा प्रस्ताव कसा हा मुद्दा आहे. २० लाखांचे काम हे कोल्डमीक्सचे आहे. जिल्ह्यात १५ लाखांच्यावर एकही काम हॉटमिक्स शिवाय झालेले नाही. मग याच कामाला कोल्डमीक्सची मंजुरी कशी असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पीयूषला हे काम मिळावे म्हणूनच हॉटमिक्सला मंजुरी दिल्याचे सांगितले जाते. एकाच लांबीच्या रस्त्यावर दोन कामे करायची कशी, आधी आठ लाखांचे काम होणार की २० लाखांचे आदी मुद्दे उपस्थित केले जात आहे. कंपनीतील मित्रत्व व नातेसंबंध सांगून पीयूष ही कामे पदरी पाडून घेतो. प्रदीप देवसटवार हे उमरखेडचे बांधकाम उपअभियंता असून त्यांच्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २च्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. त्यामुळे नियमबाह्य कामांवर आक्षेप घेणार कोण असा मुद्दा आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संपूर्ण जिल्हाभर दर्जेदार व हॉटमिक्सच्या कामासाठी आग्रह धरतात, मात्र आता त्यांच्याच गृह तालुक्यातील विडूळ सर्कलमध्ये बांधकामातील गैरप्रकार पुढे आल्याने ते आता कुणावर कारवाई करतात याकडे नजरा लागल्या आहेत.   असाच प्रकार जिल्ह्यात इतरत्र असण्याची शक्यताही बांधकाम वर्तुळातून व्यक्त केली जाते. 

उमरखेडचा कारभार चालतो यवतमाळवरून उमरखेड बांधकाम उपविभागाचा कारभार यवतमाळवरून पाहिला जातो. पंचायत समितीच्या कामांना कप्लीशन सर्टिफीकेट (सीसी) बंधनकारक आहे. यासाठी पंचायत समितीतील संबंधित लिपिक आठवड्यातून दोन दिवस संपूर्ण रेकॉर्ड घेऊन यवतमाळला जात असल्याचे सांगितले जाते. देवसटवार साईटवर जात नाहीत, कार्यालयात बसून ‘सीसी’ देतात, कार्यालयात दुपारी १ नंतर उगवतात अशाही तक्रारी त्यांच्याबाबत कंत्राटदारांमधून ऐकायला मिळतात.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदpwdसार्वजनिक बांधकाम विभाग