शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात आग लागून दोन दुकाने जळून खाक; दिवाळीच्या दिवशीची घटना

By विलास गावंडे | Updated: October 25, 2022 11:01 IST

काळे इन्शुरन्स मध्ये प्रथम आग लागली हे लक्षात येऊनही कोणतीही सुविधा नसल्याने आगेवर नियंत्रण मिळवता आले नाही. 

राळेगाव (यवतमाळ) : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना लक्ष्मीची पूजा  सुरू असताना रात्री नऊ वाजता क्रांती चौकातील काळे इन्शुरन्स सर्विस व शिव किराणा दुकान हे दोन दुकाने जळून खाक झाली आग कशाने लागली याचे नेमके कारण करू शकले नाही. ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला शिव किराणा दुकानचे संचालक संदीप वाघ हे दुकानांमध्येच होते. बाजूच्या काळे इन्शुरन्स मध्ये प्रथम आग लागली हे लक्षात येऊनही कोणतीही सुविधा नसल्याने आगेवर नियंत्रण मिळवता आले नाही. 

काळे इन्शुरन्स सर्विस मधून बाजूला असलेल्या शिव किराणा दुकानात आग शिरली. संदीप वाघ यांनी कसेबसे काऊंटर मधील पैसे व चार तेलाचे पिपे बाहेर काढले. डोळ्यादेखत आगीने भडका घेतला. यात संपूर्ण किराणामाल व काळे इन्शुरन्स सर्विसमधील महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर, एसी सर्व क्षणात जळून खाक झाले.

नागरिकांची एकच धावपळ

आपली पूजा सोडून परिसरातील सर्व नागरिक ठिकाणी पोहोचले मिळेल त्या साधनांनी आगेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला राळेगाव येथे अग्निशामक नियंत्रणाची कोणतीही साधने नसल्याने यवतमाळ व घटांची वरून अग्निशामक बंब बनवण्यात आले तब्बल चार तासांनी आगेवर नियंत्रण आले यात शिव किराणा दुकानातील जवळपास२० लाखाचे नुकसान झाले तर काळे इन्शुरन्स सर्विस चे 15 लाखाचे वर नुकसान झाल्याचे सांगितले घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पाटील ठाणेदार संजय चौबे यांनी धाव घेऊन घटनेची माहिती प्रशासनाला दिली.

राळेगाव येथे अग्निशामक वाहनांची गरज

राळेगाव शहरात आसपास 14 जिनिंग आहे मोठे उद्योग इथे आहे परंतु नगरपंचायत व प्रशासनाकडे अग्निशामक वाहनाची व्यवस्था नसल्याने आगीसारखे प्रसंग घडल्यास यवतमाळ वणी हिंगणघाट वर्धा अशा ठिकाणावरून यंत्रणेला बोलवावे लागते अग्निशामक यंत्रणेची व्यवस्था करावी अशी जनतेची मागणी आहे

टॅग्स :fireआग