शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

विहिरीत दरड कोसळून दोन मजूर ठार

By admin | Updated: February 1, 2015 23:04 IST

विहिरीचे खोदकाम सुरू असताना दरड कोसळून दोन मजूर ठार झाले तर १० वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

उमरखेड : विहिरीचे खोदकाम सुरू असताना दरड कोसळून दोन मजूर ठार झाले तर १० वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. कांताराव रामराव नाईक (३५), देवबा नागोराव गायकवाड (४०) असे ठार झालेल्या मजुरांचे नावे आहे. तर योगेश तांबारे (१०) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पिंपळदरी येथील सुशीला मनोहर कांबळे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. या विहिरीमध्ये कांताराव, विठोबा, योगेश काम करीत होते. अचानक विहिरीच्या वरच्या बाजूने असलेली दरड कोसळली. त्या दरडीतील मोठा दगड या तिघांच्या अंगावर पडला. त्यात कांताराव आणि देवबा जागीच ठार झाले तर योगेशच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा झाल्या. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ तिघांनाही बाहेर काढण्यात आले. योगेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नांदेड येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे नायब तहसीलदार राजेश चव्हाण, पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची तक्रार जयभीम कांबळे यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)