शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दोन अपघातात दोन ठार

By admin | Updated: April 26, 2016 01:55 IST

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह तरुण जागीच ठार झाला. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा

यवतमाळ : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह तरुण जागीच ठार झाला. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ कारने दुचाकीला धडक दिली. त्यात तरुण जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कार पेटवून दिली. तर दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील जेवली येथे घडली. ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. तिचा चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भरधाव कारची दुचाकीला धडक लागली. यात दयाराम किसन राठोड (३८) रा. तिवसा ता. यवतमाळ हा जागीच ठार झाला. तर अनिल शंकर पवार (३५) रा. तिवसा हा गंभीर जखमी झाला. हे दोघे दुचाकी एम.एच.२९-एयू-७३४५ ने सोमवारी सकाळी ८.३० वाजता यवतमाळकडे येत होते. त्याच वेळी यवतमाळकडून दारव्ह्याकडे जाणाऱ्या वॅगनआर कार (एम.एच.२९-आर-२४९७) ने जबर धडक दिली. त्यात दयाराम जागीच ठार झाला. तर अनिलला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातस्थळी उभ्या असलेल्या कारला अज्ञात इसमांनी आग लावून दिली. यात कार पूर्णत: जळून भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच लाडखेड आणि दारव्हा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. सदर कार आनंद पुंडलिक मराडे रा. बालाजी सोसायटी यवतमाळ यांच्या मालकीची असून चालक विजय धनसिंग राठोड रा. लोहारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना उमरखेड तालुक्यातील जेवली येथे सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात तिचा चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. सुनीता रामदास येरवाड (२५) रा. बोदडी ता. किनवट असे मृत महिलेचे नाव आहे. तर संदीप रामदास येरवाड (४) असे जखमी मुलाचे नाव आहे. सुनीताच्या बहिणीकडे मंगळवारी लग्न असल्याने सुनीता आपल्या पुतण्यासोबत दुचाकीने जेवलीनजीकच्या मथुरानगर तांडा येथे येत होती. गावाजवळ मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात सुनीता ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या चाकात आली आणि जागीच ठार झाली. तर तिचा मुलगा संदीप याच्या दोनही पायाला जबर दुखापत झाली. पुतण्या या अपघातात सुर्दैवाने बचावला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बिटरगाव पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली.