शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पदयात्रेसाठीच्या भोजनातून दोनशे जणांना झाली विषबाधा, महानुभाव पंथीयांची पदयात्रा

By सुरेंद्र राऊत | Updated: February 19, 2024 20:28 IST

दारव्हा उपजिल्हा रुग्णालय व यवतमाळात उपचार

सुरेंद्र राऊत, यवतमाळ: माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा निघाली. ही पदयात्रा मजल दरमजल करीत मार्गक्रमण करीत होती. दारव्हा तालुक्यातील चिकणी कामठवाडा येथे सोमवारी ही पदयात्रा पोहोचली. येथे पदयात्रेतील भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. जेवण झाल्यानंतर काही वेळातच मळमळ व उटली हा त्रास सुरू झाला. काहींना लगतच्या गावातील खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. मोठ्या प्रमाणात ही लक्षणे दिसू लागल्याने रुग्णांना दारव्हा व यवतमाळ येथे हलविण्यात आले.

राजू घाटोळ यांच्या घरी चिकणी येथे पदयात्रेसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माहूर येथून मोझर मार्गे ही पदयात्रा जांभोरा येथे जाणार होती. सोमवारी दुपारी जेवण केल्यानंतर अनेकांना मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला. ४० जणांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये नाशिक येथून पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा समावेश आहे. तर उर्वरित १८ जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींनी गावातच खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतला आहे. जवळपास २०० जणांना जेवणानंतर ही लक्षणे आढळून आली. नेमक्या कुठल्या पदार्थातून विषबाधा झाली, याची तपासणी करण्यासाठी अन्नाचे नमुने सोबत आणले आहे. या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली होती. दारव्हा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा