शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या खात्म्यानंतर झाले दोन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:19 IST

नरभक्षक वाघिण अवनीच्या खात्म्यानंतर तालुक्यात या मोहीमेशी संबंधित दोन जणांचे दोन सत्कार दोन ठिकाणी झाले. त्यातील एक सत्कार गाजला, तर दुसरा केवळ औपचारिकता ठरला.

ठळक मुद्देराळेगाव तालुक्यातील एक सत्कार गाजला : दुसरा मात्र केवळ औपचारिकच ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : नरभक्षक वाघिण अवनीच्या खात्म्यानंतर तालुक्यात या मोहीमेशी संबंधित दोन जणांचे दोन सत्कार दोन ठिकाणी झाले. त्यातील एक सत्कार गाजला, तर दुसरा केवळ औपचारिकता ठरला.सावरखेड येथे शार्प शुटर शफाकत अली व त्याचा मुलगा असगर अली यांचा गावकरी व तालुका काँग्रेस कमेटीने सत्कार केला. तत्पूर्वीच बोराटी येथे वन्यप्राणीग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या सभेत पालकमंत्री मदन येरावार, शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोर तिवारी, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी उपवनसंरक्षक के.अभर्णा यांचा सत्कार केला. मात्र हा सत्कार केवळ औपचारिकताच ठरला.वनविभागाच्या निमंत्रणावरून शफाकत अली व त्याचा पुत्र असगर अली याने अवणीला टिपले. नंतर झालेल्या घडामोडीत प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या चौकशीला सामोरे गेलेल्या पिता-पुत्रांचा सावरखेड येथे रात्री सत्कार झाला. काँग्रेसच्या एका पदाधिकाºयाच्या गावात झालेला हा सत्कर अनेक अर्थाने गाजला. दुसरीकडे काँग्रेसचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते अवनीच्या खातम्यामुळे सरकार विरोधी भूमिका घेत होते.शफाकत अली व असगर अली हे पिता-पुत्र व्यावसायिक शुटर असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यांचे महात्म्य सत्कारातून वाढविण्यात आल्याबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील दोन अडीच वर्षांपासून उपवनसंरक्षक के.अभर्णा यांनी वेळोवेळी या भागातील स्थिती सांभाळली.अनेकदा कटू प्रसंगांचा, लोकांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला.१० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘टी-१’ शोध मोहिमेच्या मॉनिटरींग चिफ म्हणून अगदी अखेरपर्यंत त्यांनी धिरोदात्तपणे प्रत्येक पावलावर नेतृत्व केले. संपूर्ण परिसरावर वॉच ठेवून वरिष्ठ, कनिष्ठ यात सुयोग्य समन्वय साधला. वाघ पिडीत गावातील नागरिकांतही विश्वास राखण्याची कामगिरी बजावली.बोराटीची नवीन ओळखआमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी बोराटी हे २७५ लोकसंख्या असलेले गाव दोन वर्षांपूर्वी दत्तक घेतले. ते आता अवनी वाघिणीच्या खातम्याने वेगळ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण