शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धनोडा पुलावरून रात्रीपासून बेपत्ता असलेले ते दोघे ‘दीर-भावजय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:45 IST

एका महिन्यापूर्वी घरून दोघेही गायब एका महिन्यापासून घरून गायब : वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील रहिवासी फोटो २ ज्ञानेश्वर ठाकरे ...

एका महिन्यापूर्वी घरून दोघेही गायब

एका महिन्यापासून घरून गायब : वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील रहिवासी

फोटो २

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव : तालुक्यातील धनोडा येथे पुलावरून बुधवारी रात्री पैनगंगेच्या पात्रात उडी घेतल्याचा संशय असलेले तरुण आणि तरुणी नात्याने दीर-भावजय असल्याची माहिती पुढे आली. पुलाच्या लोखंडी कठड्याला एक बॅग व पर्स अडकून होती. त्यात तरुणाचे आधारकार्ड आहे. बॅगमध्ये पासपोर्ट फोटोसह बिस्कीट पुडा व नास्त्याचे अन्य साहित्य सापडले होते. पुलावर दोघांच्याही चप्पल आढळून आल्या. आधार कार्डवर तरुणाचे नाव हेमंत राजेंद्र चिंचोलकर (३१), तर महिलेचे नाव सोनाली संदीप चिंचोलकर असल्याची माहिती गुरुवारी माहूर पोलिसांनी दिली.

हेमंत हा सोनालीचा चुलत दीर आहे. हेमंत अविवाहित असून सोनालीचा १५ वर्षांपूर्वी हेमंतचा चुलत भाऊ संदीप चिंचोलकर यांच्याशी विवाह झाला. चालबर्डी, ता. भद्रावती हे सोनालीचे माहेर आहे. १ ऑगस्टला सोनाली चुलत दिरासोबत घरून निघून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी माहूर पोलिसांना दिली. सोनालीच्या भावाने भद्रावती पोलिसांकडे तेव्हाच मिसिंगची तक्रार दिल्याची माहिती आहे.

सोनालीला अनुक्रमे ९ आणि १३ वर्ष वयाच्या दोन मुली असल्याची माहिती आहे. एक महिन्यापासून कुटुंबीय या दोघांचा शोध घेत आहेत. हेमंत आणि सोनाली बुधवारी सायंकाळी बसने धनोडा येथे आले. त्यांनी या ठिकाणी तब्बल २ तास घालवले. नंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांची बॅग, पर्स आणि चप्पल पुलाजवळ आढळल्या. या दोघांनी पैनगंगेत उडी घेऊन जीवाचे बरेवाईट केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी नदीत उडी घेतली किंवा नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. ही घटना माहूर तालुक्याच्या हद्दीत येत असल्याने माहूरचे ठाणेदार नामदेव रिठे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

बॉक्स

माहूर पोलीस दोघांच्याही शोधात

हेमंत राजेंद्र चिंचोळकर व सोनाली संदीप चिंचोलकर हे नात्याने दीर व भावजय आहे. १ सप्टेंबर रोजी माहूर हद्दीतील धनोडा येथील पैनगंगा नदीत उडी घेऊन ते मरण पावले, असा माहूर पोलिसांना संशय आहे. त्यांच्या बॅग्स पैनगंगा नदीच्या शेजारील किनाऱ्यावर आढळून आल्या. हेमंत यांचे काका आणि भाऊ गुरुवारी माहूर पोलीस ठाण्यात येऊन भेटून गेले. शेगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील पोलीस ठाण्यामध्ये त्यांची मिसिंग तक्रार दाखल आहे. अद्याप त्यांचा शोध सुरू आहे. नदीकाठच्या गावांशी आम्ही संपर्कात असल्याचे माहूरचे ठाणेदार नामदेव रिठे यांनी सांगितले.

020921\1753-img-20210902-wa0039.jpg

हेमंत राजेंद्र चिकॉलाकर व सोनाली संदीप चिंचोलकर