उमरखेड : तालुक्यातील दहागाव शिवारासह उमरखेड शहरातील मुतूर्जानगर परिसरात दोन मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस त्या निर्दयी मातांचा शोध घेत आहे.शहरातील डॉ.झाकीर हुसेन वार्डातील मुर्तूजा नगर परिसरात सकाळी ९ वाजता प्लॉस्टिकच्या पोत्यात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. या घटनेची चौकशी सुरू असतानाच चार तासाच्या अंतराने पुसद मार्गावरील दहागाव शिवारात पुरुष जातीचे मृत अर्भक कापडी पिशवीत आढळल्याची माहिती मिळाली. शिवारात कामासाठी गेलेल्या महिलांनी एक कुत्रा तोंडात पिशवी घेऊन पळत असल्याचे दिसले. त्यांनी कुत्र्याचा पाठलाग केला असता त्यामध्ये मृत अर्भक आढळले. या घटनेची माहिती पोलीस पाटील अरविंद शिंदे यांनी पोलिसांना दिली. एकाच दिवशी दोन मृत अर्भक तालुक्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस निर्दयी मातांचा शोध घेत आहे.
उमरखेडमध्ये दोन मृत अर्भक आढळले
By admin | Updated: March 8, 2016 02:38 IST