शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच घटनेच्या दोन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

जिल्हा बॅंकेने चिलगव्हाण सोसायटीतील अपहारासंदर्भात पाेलीस तक्रार दिल्याचे समजल्यानंतर चिलगव्हाण सोसायटीच्या सचिवाने   ठाण्यात धाव घेवून बँकेच्या अधिकारी-कर्मचारी व बनावट कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी अशा २१ जणांविरुद्ध सोमवारी महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली.  एकाच प्रकरणात दोन तक्रारी आल्याने  सविस्तर माहितीसाठी ठाणेदाराने हे प्रकरण वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अंकेक्षण अहवाल मागितल्याचे समजते. 

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव :  चिलगव्हाण सोसायटीतील अपहारप्रकरणी मंगळवारी जिल्हा बॅंक आणि चिलगव्हाण सोसायटीच्या वतीने स्वतंत्र   तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. एकाच प्रकरणात दोन तक्रारी देण्याचा हा प्रकार अनावधानाने झाला की जाणीवपूर्वक अशी चर्चा असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तक्रारीत अहवालातील नावे वगळून केवळ सेवा सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्या विराेधात  बँकेने तक्रार दिली आहे. या प्रकरणात काहीजणांना वाचविण्याचा प्रयत्न होत नाही ना अशी चर्चा आहे. जिल्हा बॅंकेने चिलगव्हाण सोसायटीतील अपहारासंदर्भात पाेलीस तक्रार दिल्याचे समजल्यानंतर चिलगव्हाण सोसायटीच्या सचिवाने   ठाण्यात धाव घेवून बँकेच्या अधिकारी-कर्मचारी व बनावट कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी अशा २१ जणांविरुद्ध सोमवारी महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली.  एकाच प्रकरणात दोन तक्रारी आल्याने  सविस्तर माहितीसाठी ठाणेदाराने हे प्रकरण वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अंकेक्षण अहवाल मागितल्याचे समजते. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालानुसार जवळपास एक कोटी रुपये बनावट कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  बँकेच्या निर्देशावरून वसुली अधिकारी नाना जळगावकर यांनी सोमवारी फिर्याद दाखल केली आहे.जळगावकर हे सोमवारी सकाळी महागाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, तांत्रिक कारणावरून त्यांना मंगळवारी बोलावून घेण्यात आले व सविस्तर तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यामध्ये चिलगव्हाण सोसायटीचे अध्यक्ष आणि  कंत्राटी सचिव या दोघांनाच जबाबदार धरण्यात आले आहे.चिलगव्हाण  संस्थेमधून सन २०१६-१७  ला १३ लाख ८१ हजार ५०० रुपये नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आले.  सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक एम. आर. चवरे, वसुली अधिकारी एस. पी. भरवाडे, शाखा निरीक्षक अशोक राठोड आणि सचिव एस. पी. नरवाडे यांना अहवालानुसार जबाबदार धरण्यात आले. सन २०१८-१९ ला ३८ लाख ७४ हजार २७० रुपये नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आले. यू. व्ही. जोशी, अविनाश राठोड, एस. पी. भरवाडे, निशिकांत श्रीरामे, कंत्राटी लिपिक बीबीचंद राठोड, प्रमोद भोयर, नरेंद्र कदम आणि सचिव एस. पी. नरवाडे यांना जबाबदार धरण्यात आले. सन २०१९-२० ला २२ लाख ६६ हजार ५०० रुपये नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणात प्रकाश राठोड, निशिकांत श्रीरामे, एस. पी. भरवाडे, बीबीचंद राठोड, नरेंद्र कदम आणि सचिव एस. पी. नरवाडे यांना जबाबदार धरण्यात आले. असे असताना दोघांविरुद्ध  तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि चिलगव्हाण सेवा सोसायटी हे एकमेकाविरुद्ध बोट दाखवून हे घोटाळे जाणीवपूर्वक लोंबकळत कसे राहतील,  यासाठीच पाठशिवणीचा खेळ खेळत असल्याने बँकेच्या ठेवीदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा बॅंकेचा कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न  - १८ ऑक्टोबर २०२१ रोजी तपासणी केलेल्या अहवालानुसार संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित केली असून, हिवरा शाखेला संलग्न असलेल्या इतर सेवा सोसायटीची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या अहवालानुसार चार अधिकारी नुकतेच निलंबित करण्यात आले असून, अहवालात नमूद असलेल्या इतरांना पाठीशी घातले जात असून, केवळ चिलगव्हाण सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनाच दोषी धरले जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

९१ लाख रुपयांच्यावर आर्थिक गुन्हा असल्याने तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी यवतमाळ पाठवला आहे.  फिर्यादीमध्ये ऑडिट रिपोर्ट नाही, त्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सविस्तर फिर्याद दाखल करणे अपेक्षित होते. घटना एकच असून, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि चिलगव्हाण सोसायटीचे सचिव यांनी दोन वेगवेगळ्या फिर्याद दाखल केलेल्या आहे. अजून गुन्हा दाखल झालेला नाही.- विलास चव्हाण, पोलीस निरीक्षक महागाव पोलीस स्टेशन

 

टॅग्स :bankबँक