शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महिला सहकारी बँकेतील शाखा व्यवस्थापकासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 17:43 IST

Yavatmal : २०६ पैकी आतापर्यंत १२ आरोपींवर अटकेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी, मूल्यांकनकार लेखा परीक्षक या सर्वांनी संगनमत करीत २४२ कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडून केला जात आहे. २०६ आरोपींपैकी आतापर्यंत या पथकाने १२ जणांना अटक केली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एक कर्जदार आणि शाखा व्यवस्थापक महिला या दोघांना ताब्यात घेतले.

गजानन सीताराम कोकाडे (रा. वैभवनगर वाघापूर), तत्कालीन शाखा व्यवस्थापक पौर्णिमा गिरीष गिरडकर (रा. शिव अपार्टमेंट उमरसरा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना एसआयटीने शुक्रवारी दुपारी राहत्या घरून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करीत पोलिस कोठडी मागण्यात आली. 

न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर दिला आहे, तर यापूर्वी एसआयटीने आशिष गेडाम (रा. श्रीकृष्ण नगर दारव्हा रोड), राजू मस्की (रा. मारेगाव) या दोन थकीत कर्जदारांना अटक केली होती. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

विशेष तपास पथकाचे प्रमुख रजनीकांत चुलुमुला यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सागर दानडे, जमादार मिलिंद गोफणे, सूरज शिंदे, सचिन पिंपळकर, अपर्णा जाधव, दीपाली माकोडे, चालक रविकांत नांदेकर यांनी ही कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.

दिवाळीत एसआयटीचे अटकसत्र बाबाजी दाते महिला सहकारी बँक अपहार प्रकरणात अनेक दिग्गजांवर आरोप ठेवण्यात आले आहे. अजूनपर्यंत अशा मोठ्या आरोपीला एसआ- यटीने अटक केलेली नाही. आता दिवाळीच्या सणाची संधी साधत एसआयटी सक्रिय झाली आहे. आरोपींचा माग काढून अटकसत्र राबविले जात आहे. दोन आठवड्यांत चार आरोपींना एसआयटीने अटक केली आहे. या अटकसत्रामुळे आरोपी पुन्हा एकदा भूमिगत झाले आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ