शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

यवतमाळात अडीच लाखांचे बोगस खत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:00 IST

शनिवारी सकाळी दिग्रस तालुक्यातील तिवरी या गावात बावणे कृषी केंद्रात मालवाहू एसटीतून आलेला बोगस खताचा साठा उतरविला गेला. सापळा लावून असलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी लगेच हा साठा जप्त केला.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यात कारखानाचंद्रपूरच्या मालवाहू एसटीमधून वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी विभागाने शनिवारी जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात अडीच लाख रुपयांचे बोगस खत जप्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे या बोगस खताचा कारखाना आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी एसटी आगाराच्या मालवाहू बसमधून हे खत सर्वदूर पोहोचविले जात असल्याची माहिती उघड झाली.गेल्या काही दिवसांपासून मालवाहू एसटीद्वारे हे बोगस खत यवतमाळ शहर व जिल्ह्यात पोहोचविले जात होते. त्याची कुणकुण लागताच कृषी विभागाने सापळा रचला. त्यानुसार, शनिवारी सकाळी दिग्रस तालुक्यातील तिवरी या गावात बावणे कृषी केंद्रात मालवाहू एसटीतून आलेला बोगस खताचा साठा उतरविला गेला. सापळा लावून असलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी लगेच हा साठा जप्त केला. डीएपीच्या नावावर शेतकऱ्यांच्या माथी मारले जाणारे बोगस खताच्या २०० बॅग जप्त करण्यात आल्या. वितरकाला ५०० ते ६०० रुपयात मिळणार ही बॅग शेतकऱ्याला १२०० रुपयात विकली जाते. या जप्त मालाची किंमत अडीच लाखांच्या आसपास सांगितली जाते. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात वितरक व कारखाना मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे.एसटीने दररोज तीन फेऱ्यागडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील बोगस खत कारखान्यातून माल पोहोचविण्यासाठी खास ब्रम्हपुरी आगाराच्या बस बुक केल्या जातात. दररोज मालवाहू तीन बसद्वारे हे खत यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर अशा विविध जिल्ह्यात पोहोचविले जाते. दारव्हा तालुक्यातील सोनोने नामक व्यक्ती दुकानांमध्ये हे खत पोहोचविण्याचे काम करते. कृषी विभागाने या युवकालाही ताब्यात घेण्यासाठी पथक पाठविले आहे.कारखाना सील करणारदिग्रस तालुक्यातील कारवाईची माहिती नागपूरच्या कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार वडसा येथील बोगस खताचा हा कारखाना सील करण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी दत्तात्रय आवारे, दिग्रसचे तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, राहुल डाखोरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रमोद बागडे आदींनी ही कारवाई केली. कृषी विभागातील लिपिक प्रणव एंबडवार यांना डमी ग्राहक म्हणून पाठविले गेले होते. त्यामुळे त्यांच्याही या कारवाईत मोठी मदत झाली.डीएपीच्या नावावर विकले जाणारे बोगस खत जप्त केले आहे. हे खत नसून केवळ राख असल्याचे कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी