शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या वारीत उपक्रमांची चंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:11 IST

निरागस मुलांच्या गोतावळ्यावर माया करीत जिल्ह्याच्या कानाकोपºयात काम करणाऱ्या शिक्षकांवर अनेकदा टीका होते. पण खेड्यापाड्यात नवनवे तंत्रज्ञान वापरत अध्यापन करणाºया या गुरुजींच्या अंत:करणात अनेक सर्जनशील उपक्रमही जन्म घेत असतात.

ठळक मुद्देव्यावसायिक विकास संस्था : शिक्षक, विद्यार्थी, पालकांची विविध स्टॉल्सवर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निरागस मुलांच्या गोतावळ्यावर माया करीत जिल्ह्याच्या कानाकोपºयात काम करणाऱ्या शिक्षकांवर अनेकदा टीका होते. पण खेड्यापाड्यात नवनवे तंत्रज्ञान वापरत अध्यापन करणाऱ्या या गुरुजींच्या अंत:करणात अनेक सर्जनशील उपक्रमही जन्म घेत असतात. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अशाच उपक्रमांची दोन दिवस यवतमाळात जत्रा भरली आहे.जिल्हास्तरीय शिक्षणाच्या वारीच्या निमित्ताने खेड्यापाड्यातील गुणवत्ता शहराच्या पटलावर झळकली आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट), जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही वारी भरविण्यात आली आहे.दोन दिवसीय शिक्षणाच्या वारीचे उद्घाटन शुक्रवारी डायटच्या प्रांगणात पार पडले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, बांधकाम सभापती नीमिष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, सीईओ जलज शर्मा, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश होसकुटी, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे, वारीचे मुख्य संयोजक मधुकर काठोळे आदी मान्यवर उपस्थित होते.वारीमध्ये शैक्षणिक उपक्रमांची एकंदर २५ दालने आहेत. इंग्रजी, गणित, ज्ञानरचनावाद, विज्ञानाचे प्रयोग, तंत्रस्नेही शाळा, स्काईपीचा डेमो, समावेशित शिक्षण, बाहुली नाट्य, संख्याज्ञान आदी शैक्षणिक दालनांसह व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान अशा सामाजिक विषयांचेही दालन येथे आहे. यात सुधाकर वांढरे, वैशाली हजारे, राजेश उरकुडे, वसंत शेळके, रविश गवई, प्रवीण देवकते, महादेव निमकर, अरविंद झळके, संजय चुनारकर, अवधूत वानखडे, सतीश बोरखडे, ओंकार राठोड, संजय तुरक, मंगला कोडापे, महेंद्र कोल्हे आदी शिक्षकांनी ही दालने लावली आहेत. तर वर्ध्याचे शरद ढगे आणि अमरावतीच्या दीपाली बाभूळकर यांचाही यात समावेश आहे.