शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

पारंपरिक पिकांऐवजी इतर पिकांकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:57 IST

पारंपारिक पिकांसोबतच आता शेतकऱ्यांनी लसूण, मिरची, कांदा, ओवा, सोप, धने यासारखी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवावे, असे आवाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी केले.

ठळक मुद्देकुलगुरु भाले : अंबोडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रक्रिया करूनच शेतमाल विकावा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : पारंपारिक पिकांसोबतच आता शेतकऱ्यांनी लसूण, मिरची, कांदा, ओवा, सोप, धने यासारखी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवावे, असे आवाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी केले.तालुक्यातील अंबोडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अंबोडा येथे राष्ट्रीय मसाला पिके व सुपारी संचलनालय कालिकत (केरळ) अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्रातर्फे व पैनगंगा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने मसाला बियाणे, पिके आधुनिक लावगड तंत्रज्ञान प्रशिक्षण दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ.भाले यांच्यासह ईतरही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.डॉ.खर्चे यांनी मसाला, भाजीपाला पिके, मिरची, लसूण, कांदा, ओवा, सोप व धने यांचे विद्यापीठाद्वारा विकसित बियाण्यांचा विदर्भातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शेतकºयांनी शेतमाल थेट विकू नये. त्यावर प्रक्रिया करून तो कसा विकता येईल, यासाठी प्रयत्न करावा, असेही सांगितले. यासाठी विद्यापीठाचे मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांनी सांगितले. कांदा, लसूण, हळद, ओवा, सोप यावर डॉ.डी.टी. देशमुख, प्रा.व्ही.डी. मोहोड, डॉ.एम.एन. इंगोले आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मिरची व भाजिपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. एस.एम. घावडे यांनी केले. पैनगंगा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष माधव राऊत यांनी आयोजन केले. संचालन डी.एस. फड यांनी केले.राज्य पुरस्कार प्राप्त अशोक वानखेडे, सरपंच देवानंद राठोड, विलास राऊत, रामराव राऊत, मनोहर महाजन, ऊमेश आचमवार, गुणवंत राऊत, विकास खडसे, संतोष चौधरी, पुंडलिक गावंडे, सुनील कातकीडे, प्रफुल बघेल, नीलेश आचमवार, दिलीप ठाकरे, संजय काषेटवार यांच्यासह अंबोडा, कोसदनी, साकूर, दोनवाडा, लोणबेहळ, शेलू, शेंदूरसनी, आर्णीचे शेतकरी उपस्थित होते. आभार कनिष्ठ संशोधन सहाय्यक अभिलाषा खारकर यांनी मानले.

टॅग्स :agricultureशेती